Jobs & Increment Report : देशात कुठल्या शहरात आहेत जास्त पगाराच्या नोकऱ्या?

Jobs & Increment Report : नोकऱ्या, पगारवाढीच्या बाबतीत मुंबईत कुठे आहे?

102
Jobs & Increment Report : देशात कुठल्या शहरात आहेत जास्त पगाराच्या नोकऱ्या?
  • ऋजुता लुकतुके

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पण, नोकरीच्या आणि पगारवाढीच्या सर्वाधिक संधी याच शहरात आहेत का? शिक्षित लोकांच्या सरासरी पगार आणि पगारवाढीचे आकडे बघितले तर मुंबईचा आतापर्यंत असलेला अव्वल क्रमांक आता बंगळुरू शहराने हिरावून घेतलेला दिसतोय. ताज्या जॉब्स आणि सॅलरी अहवालात सरासरी २९,५०० रुपये इतक्या मासिक पगारासाह बंगळुरूने मुंबईवर आघाडी घेतली आहे. तर मुंबईतील सरासरी वेतन हे २५,५०० रुपये इतकं असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. टिमलीझ सर्व्हिसेसनी हे सर्वेक्षण केलं असून ‘जॉब्स अँड सॅलरीज प्राईमर रिपोर्ट’ हा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. बंगळुरू इथं गेल्या वर्षाच्या तुलनेत नोकऱ्यांमध्ये ९.३% इतकी वाढ झाली आहे. इथलं सरासरी मासिक वेतन २९,५०० रुपये आहे. या अहवालात हंगामी आणि स्थायी नियुक्ती बाजारपेठांमधील एकीकृत वेतनाचे विश्लेषण करून निवडक शहरे आणि उद्योगांतील कल कसा आहे याबाबत महत्त्वपूर्ण माहिती सादर केली आहे. (Jobs & Increment Report)

(हेही वाचा – Crime News: निवडणूक पथकाचे अधिकारी असल्याचे भासवत 5 भामट्यांनी व्यापाऱ्याला घातला 25 लाखांचा गंडा)

बंगळूर पाठोपाठ चेन्नई आणि दिल्लीचा क्रमांक येतो. येथे अनुक्रमे ७.५% आणि ७.३% इतकी मजबूत पगार वाढ आहे. यामधून या रोजगार बाजारपेठांचे स्पर्धात्मक स्वरूप दिसून येते. चेन्नईमधील सरासरी मासिक वेतन २४,५०० रुपये असून दिल्लीत ते २७,८०० रुपये इतके आहे. मुंबई आणि अहमदाबाद येथे देखील स्थिर वेतनवाढ दिसून आली ज्यामधून प्रमुख रोजगार केंद्रे म्हणून त्यांचे महत्व पक्के होते. मुंबईतील सरासरी वेतन २५,१०० रुपये आहे तर पुण्याचे सरासरी वेतन २४,७०० रुपये असून त्यांनी आपली स्पर्धात्मक वेतन पातळी सांभाळली आहे. या शहरांमध्ये वेतनवाढ ४% ते १०% या श्रेणीत आहे. उद्योग आघाडीवर ८.४% वेतनवाढीसह सर्वश्रेष्ठ कामगिरी ‘रिटेल’ने केली आहे. हाच कल कन्झ्युमर ड्यूरेबल्स (५.२%) आणि बँकिंग आणि इतर सेवांमध्येही (५.१%) दिसून येतो तसेच या दोन्हींत व्यावसायिकांसाठी वृद्धीच्या दमदार संधी दिसत आहेत. दुसरीकडे, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि फार्मा, बांधकाम आणि रियल इस्टेट यांसारख्या क्षेत्रांत सामान्य वृद्धी दिसली आहे, जी कुशल व्यावसायिकांसाठीची त्यांची स्थिर मागणी दाखवते. सर्वाधिक वेतन देणाऱ्या उद्योगांमध्ये टेलिकम्युनिकेशन्स २९,२०० रुपये, उत्पादन, इंजिनियरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर (२८,२०० रुपये), हेल्थकेअर आणि फार्मा (२७,६०० रुपये) आणि बांधकाम आणि रियल इस्टेट (२७,००० रुपये) यांचा समावेश आहे. (Jobs & Increment Report)

(हेही वाचा – Manipur मध्ये निमलष्करी दलाच्या 20 कंपन्या तैनात)

टीमलीज सर्व्हिसेसच्या स्टाफिंग विभागाचे सीईओ कार्तिक नारायण म्हणाले, “हा अहवाल भारतातील रोजगार मार्केटमधील सकारात्मक चलन अधोरेखित करतो आणि विविध शहरे आणि उद्योगांत लक्षणीय पगार वाढ दर्शवितो. बंगळूरमधील ९.३% वेतनवाढ आणि रिटेलमधली दमदार ८.४% वाढ विशिष्ट कौशल्यांच्या वाढत्या मागणीकडे निर्देश करते. यामधून केवळ वेतन वृद्धीतील वाढ दिसत नाही, तर रोजगार मार्केटमध्ये होत असलेल्या सखोल बदलाचा अंदाजही येतो. कन्झ्युमर ड्यूरेबल्स आणि बांधकाम व रियल इस्टेट सारख्या क्षेत्रांमध्ये स्थायी आणि हंगामी नोकऱ्यांमधील वेतनातील अंतर कमी होणे दर्शविते की, कंपन्या प्रतिभेच्या समानतेवर आणि कर्मचाऱ्यांना दीर्घ काळ धरून ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. हे कल भारतात कामाच्या भविष्याला आकार देण्यात अनुकूलता आणि कौशल्याचे वाढते महत्त्व अधोरेखित करत आहेत.” (Jobs & Increment Report)

(हेही वाचा – IPL 2025 : मुनाफ पटेल दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक)

हा अहवाल गेल्या पाच वर्षात नियमित वेतन वाढ देणाऱ्या काही विशिष्ट नोकऱ्यांवर देखील प्रकाश टाकतो. एफएमसीजी उद्योगात सर्वाधिक वृद्धी दिसते, ज्यात ट्रेनी असोसिएट आणि पायलट ऑफिसर या नोकऱ्यांसाठी अनुक्रमे ९.५% आणि ८% इतका जोरदार सीएजीआर आहे. त्याच्या पाठोपाठ बँकिंग आणि इतर उद्योगात एचआर एक्झिक्युटिव्ह्ज (७.९% सीएजीआर) आणि सेल्स मॅनेजर (६.६% सीएजीआर) यांना लक्षणीय दीर्घकालीन वृद्धी मिळालेली दिसते. शहरांचा विचार केल्यास, हैदराबाद येथे ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (८.१% सीएजीआर), अहमदाबादेत बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह्ज (७.९% सीएजीआर), पुण्यात सेल्स मॅनेजर (६.८% सीएजीआर) आणि दिल्लीत डेटा कोऑर्डिनेटर (६.६% सीएजीआर) या विशिष्ट रोल्समध्ये चांगली वृद्धी दिसते आणि त्यातून उद्योग आणि शहरांत कुशल व्यावसायिकांची व्यापक मागणी प्रतिबिंबित होते. (Jobs & Increment Report)

(हेही वाचा – बुलडोझर कारवाईपूर्वी 15 दिवसांची नोटीस आवश्यक- Supreme Court)

तसेच, स्थायी आणि हंगामी रोल्ससाठी मिळणाऱ्या वेतनात समानता दिसते, खास करून कन्झ्युमर ड्यूरेबल्स, बांधकाम व रियल इस्टेट आणि अॅग्रिकल्चर व अॅग्रोकेमिकल्स यांसारख्या क्षेत्रात. या क्षेत्रांमध्ये वेतनातील फरक कमी आहे. कन्झ्युमर ड्यूरेबल्समध्ये हा फरक फक्त ६.३% आहे, बांधकाम व रियल इस्टेटमध्ये ७.८% आणि अॅग्रिकल्चर व अॅग्रोकेमिकल्समध्ये ७.९% तसेच रिटेलमध्ये ८.१% आहे. भारताचे रोजगार मार्केट सतत बदलत आहे आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा ‘जॉब्स अँड सॅलरीज प्राइमर रिपोर्ट’ बँकिंग आणि अन्य, कन्झ्युमर ड्यूरेबल्स आणि एफएमसीजीसारख्या क्षेत्रांत विशिष्ट कौशल्यांची लवचिक मागणी, वेगवेगळ्या नोकऱ्यांमधील गतिशील वेतन वाढ आणि व्यावसायिकांसाठी अधिक उज्ज्वल भविष्य दर्शवितो. (Jobs & Increment Report)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.