अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गुरुवारी (७ सप्टेंबर) रोजी प्रथमच चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. एअरफोर्स-१ ने ते दिल्लीला पोहोचतील. पंतप्रधान मोदीही त्यांचे स्वागत करू शकतात. ८ सप्टेंबर रोजी बायडेन पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत. गेल्या अनेक आठवड्यांपासून तयारी सुरू आहे. जो बायडेन यांच्या सुरक्षेसाठी व्हाईट हाऊसचे सुरक्षा रक्षक देखील तैनात असणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्याच कारने प्रवास करणार आहेत. यावेळी प्रत्येक हालचालींवर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाईल.
बायडेन हे सीक्रेट सर्व्हिसच्या ३०० कमांडोच्या सुरक्षेखाली असतील. दिल्लीच्या रस्त्यांवर येणारा सर्वात मोठा काफिलाही त्यांचाच असेल, ज्यात ५५-६० वाहने असतील. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, बायडेन यांच्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित कार ‘द बीस्ट’ देखील भारतात आणली जात आहे. या कारमध्ये बसून ते G-20 शिखर परिषदेला जाणार आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या हॉटेलला किल्ल्याचं स्वरूप आलं आहे.
भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन हे त्यांच्या खास विमान एअर फोर्स वनने येथे पोहोचत आहेत. त्याच्यासोबत अमेरिकन गुप्तचर विभागाचे सुरक्षा कर्मचारी आणि वाहनांचा संपूर्ण ताफाही भारतात पोहोचत आहे.
(हेही वाचा : Cashew For Heart : काजूचे सेवन टाळू शकते ह्रदयविकाराचा झटका !)
हॉटेलची सुरक्षा कशी आहे?
स्टेटसमनने दिलेल्या रिपोर्टनुसार, आयटीसी मौर्या हॉटेलच्या प्रत्येक मजल्यावर सीक्रेट सर्व्हिस कमांडो तैनात करण्यात आले आहेत. बायडन यांना 14व्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत नेण्यासाठी विशेष लिफ्ट बसवण्यात येणार आहे. बायडन आणि त्यांच्या टीमसाठी हॉटेलच्या 400 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या तयारीच्या दृष्टीने सरदार पटेल मार्ग आणि हॉटेलच्या आजूबाजूला रिहर्सल घेण्यात आली होती. सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. एनएसजी कमांडो, सीआरपीएफचे जवान आणि दिल्ली पोलिसांच्या जवानांनी मिळून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. आयटीसी मौर्या हॉटेलच्या बाहेरील उद्यान परिसरात देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. श्वानपथक आणि पाळत ठेवण्यासाठी वेगवेगळी उपकरणे बसवण्यात आली आहेत. येथे देखरेखीसाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा कर्मचारी सुरक्षेसाठी ‘एक्सप्लोझिव्ह व्हेपर डिटेक्शन’ (ईव्हीडी) उपकरणेही वापरत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community