Johson and Johnson baby Talc: जाॅनसन अ‍ॅंड जाॅनसन बेबी पावडरची विक्री होणार बंद

150

Johson and Johnson baby Talc: जाॅनसन अ‍ॅंड जाॅनसन कंपनीने बेबी पावडर उत्पादन बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये कंपनी जाॅनसन अॅंड जाॅनसन बेबी पावडरचे उत्पादन आणि जागतिक बाजारपेठेतील विक्री बंद करणार आहे. अनेक महिला आणि लहान मुले बेबी पावडरचा वापर करतात. जाॅनसन अॅंड जाॅनसन बेबी पावडरमुळे कर्करोगाचा धोका आहे, असे आरोप करण्यात आले होते. याविरोधात अनेक न्यायालयात खटले दाखल झाले आहेत. याशिवाय जाॅनसन अॅंड जाॅनसन बेबी पावडरचा वापर केल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोपही महिलांनी केला आहे. या आरोपांमुळे कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळेच या कंपनीने पावडर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाॅनसन अ‍ॅंड जाॅनसन कंपनीवर लागलेल्या आरोपांचं कंपनीने वारंवार खंडण केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्या उत्पादनामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे कोणतेही घटक नाहीत. पावडरमधील सर्व घटक सुरक्षित असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या जाॅनसन अ‍ॅंड जाॅनसन या अमेरिकन कंपनीविरोधात 22 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये न्यायालयाने कंपनीविरोधात निकाल देत जाॅनसन अॅंड जाॅनसन कंपनीला दंड ठोठावला होता. यामध्ये कंपनीला 200 कोटी डाॅलरचा दंड भरावा लागला आहे.

( हेही वाचा: सांगलीत पुराचा धोका: कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ,नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर  )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.