महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे आयोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. आता ही परीक्षा २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. आयोगातर्फे या बदलाचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. महसूल कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन आणि राजकीय सामाजिक स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (MPSC)
यापूर्वी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा येत्या २१ जुलै २०२४ रोजी घेण्यात येणार होती. त्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात या संयुक्त पूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले. सर्व जिल्ह्यांतील परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी यांच्या नेमणूक, प्रशिक्षण, पोलीस बंदोबस्त याचे नियोजन करण्यात आले. सर्व कोषागार (ट्रेझरी) कार्यालयांना परीक्षा साहित्याविषयी निर्देश देण्यात आले. राज्यातील लाखो परिक्षार्थींना २१ जुलै रोजी परीक्षा असल्याचे कळविण्यात आले. यामुळे परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली. (MPSC)
आता २५ ऑगस्ट दरम्यान या तयारीच्या पार्श्वभूमीवर तारीख बदलाची सूचना देण्यात आली आहे. यामुळे २१ जुलै रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. २५ ऑगस्टला सकाळी दहा ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या कालावधीत परीक्षा पार पडणार आहे. (MPSC)
(हेही वाचा – … तर ठरलं मग, ऑगस्ट महिन्यात Chenab Bridge वरून धावणार पहिली रेल्वे)
परीक्षा स्थगित करण्यात आल्याची आणि आता ती २५ ऑगस्टला होणार असल्याची सूचना विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणाना देण्यात आली आहे. या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर असते. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांनी या बदलाची माहिती पोलीस अधीक्षक, जिल्हा कोषागार अधिकारी यांना देण्यात आली आहे. परीक्षार्थीना सरावाची संधी दरम्यान परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना १ महिना ४ दिवस सरावाची संधी मिळाली आहे. मात्र अत्यल्प वयोमर्यादा संपणाऱ्या उमेदवाराची अडचण होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय काहींसाठी घातक वा अडचणीचा ठरू शकतो. ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे. (MPSC)
कामबंद कारणीभूत ?
दरम्यान परीक्षा एक महिन्याने पुढे ढकलण्यासाठी प्रामुख्याने महसूल कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांची धुरा महसूल विभागावर असते. (MPSC)
या संवर्गातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यासाठी मोठ्या सांख्येने नेमणूक करण्यात येते. परीक्षा काटेकोर शिस्तीत घेण्यात येत असल्याने आंदोलन असताना ही परीक्षा घेणे अशक्य आहे. १५ जुलैपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची शासनाने अजूनही गंभीर दखल घेतली नसल्याचे चित्र आहे. (MPSC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community