अनेक वर्षे पत्रकार क्षेत्रात काम करणारे महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे मुंबई विभागीय अध्यक्ष दीपक कैतके (Deepak Kaitke) यांना मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘पत्रकार भूषण पुरस्कार २०२४’ (Patrakar Bhushan Award 2024) घोषित झाला आहे.
शुक्रवार, ५ जानेवारी रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (Marathi Library) डॉ. सुरेंद्र गावस्कर सभागृह येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
(हेही वाचा – Israel Embassy Blast Case: इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाचे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे हस्तांतरित)
समाजाच्या विविध क्षेत्रांतील आपल्या योगदानातून समाजजीवन संपन्न करणाऱ्या मान्यवरांना मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या (Marathi Newspaper Writers Association) वतीने हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
दीपक कैतके (Deepak Kaitke) हे दैनिक ‘महासागर’ आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’चे (Hindustan Post) मुंबई प्रतिनिधी म्हणून काम पहातात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community