पत्रकारही फ्रंटलाईन वर्कर्स असल्याने त्यांनाही लस द्या! छगन भुजबळांचे पत्र 

देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत पत्रकारांना लस दिली आहे. त्यामुळे आपण देखील आपल्या राज्यातील पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यात यावा, अशी विनंती मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.

76

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील सर्व नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणावरही राज्य सरकार आणि आणि केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे. आपण ज्या पद्धतीने सर्व आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक यांना प्राधान्याने लस दिली आहे त्याच पद्धतीने राज्यातील प्रत्येक घडामोडी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पत्रकारांना देखील लस देण्यात यावी, अशी मागणी आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पत्र पाठवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात संपूर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची कोविड-१९ त्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमांद्वारे शासनास अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनीधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देवून त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांचा लसीकरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.

(हेही वाचा : संजय राऊतांकडून अहिल्याबाई होळकरांचा अवमान! वंशज भूषणसिंह राजेंनी खडसावले! )

काय म्हटले आहे भुजबळांच्या पत्रात?

महाराष्ट्राने कोरोनाच्या लढाईत अनेक महत्वाचे निर्णय घेत कोरोनाला अटकाव करण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहे. सततच्या वाढणाऱ्या कोरोना रूग्णांच्या संख्येत घट व्हावी, यासाठी आपण लसीकरणावर जोर दिला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपण प्राधान्याने लस दिली तशीच आता पत्रकारांना देखील तातडीने लस देणे गरजेचे आहे. असे मत या पत्रात छगन भुजबळ यांनी मांडले आहे. देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत पत्रकारांना लस दिली आहे. त्यामुळे आपण देखील आपल्या राज्यातील पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यात यावा, अशी विनंती देखील छगन भुजबळ यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.