कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दादर सांस्कृतिक मंचच्या वतीने ‘चंद्र आहे साक्षीला’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. (Kojagiri) स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यक्रमात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध TV शोमधील कलाकारांशी गप्पा गोष्टी करण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. या कार्यक्रमात गायक प्रवीण देहेरकर आणि गायिका अलिशा देसाई हे गीते सादर करणार आहेत. शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मागील गार्डनमध्ये अशा प्रकारे कोजागिरीचा आनंद घेता येणार आहे. संजना पाटील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. (Kojagiri)
(हेही वाचा – Eden Garden Wall Collapsed : ईडन गार्डन स्टेडियमची भिंत कोसळली ,बीसीसीआयची डोकेदुखी वाढली)
‘दादरचे सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी ‘दादर सांस्कृतिक मंच’ गेली ७ वर्षे विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम करत आहे. मराठी भाषा दिवस, कोजागिरी असे मराठी संस्कृतीशी जोडणारे कार्यक्रम आम्ही दरवर्षी विशेषत्वाने करत आहोत. कोजागिरी म्हटले की, गप्पा आणि गाणी तर रंगतातच ! स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमात ओंकार राऊत, प्रियदर्शिनी इंदलकर, शिवाली परब, वनिता खरात हे कलाकार, तसेच हास्यजत्राचे निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे आदींशी गप्पा-गोष्टी करता येणार आहेत. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा’, असे आवाहन दादर सांस्कृतिक मंचच्या अध्यक्षा उत्तरा मोने यांनी केले आहे. (Kojagiri)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community