JP Nadda To Congress : जनतेकडून लुटलेला पैसा परत करावा लागेल; जे.पी. नड्डा यांचा काँग्रेसला इशारा

JP Nadda On Dheeraj Sahu : जे.पी. नड्डा यांनी ट्विट करून काॅंग्रेसवर केली टीका

235
JP Nadda To Congress : जनतेकडून लुटलेला पैसा परत करावा लागेल; जे.पी. नड्डा यांचा काँग्रेसला इशारा
JP Nadda To Congress : जनतेकडून लुटलेला पैसा परत करावा लागेल; जे.पी. नड्डा यांचा काँग्रेसला इशारा

“जनतेकडून लुटलेला प्रत्येक पैसा परत करावा लागेल. भाऊ, तुम्हाला आणि तुमचे नेते राहुल गांधी यांनाही उत्तर द्यावे लागेल. हा नवा भारत आहे, इथे राजघराण्याच्या नावाखाली लोकांचे शोषण होऊ देणार नाही. तुम्ही धावून-धावून थकून जाल; पण तुम्हाला कायदा सोडणार नाही. जर काँग्रेस (Congress) भ्रष्टाचाराची (Corruption) गॅरंटी असेल, तर मोदीजी भ्रष्टाचारावर कारवाई करण्याची गॅरंटी आहेत, जनतेकडून लुटलेला प्रत्येक पैसा परत करावा लागेल,” असा इशारा जेपी नड्डा (JP Nadda To Congress) यांनी दिला आहे.

(हेही वाचा – ISIS In Padgha : आतंकवाद्यांचा बालेकिल्ला बनलेले गाव; पडघा-बोरिवली)

ओडिशा (Odisha) आणि झारखंडमध्ये (Jharkhand) काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू (Dheeraj Sahu) यांच्या घरावर आयकर विभागाने छापे घातले आहेत. आयकर विभागाने (Income tax Department) साहू यांच्या घरातून 300 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करून नड्डा यांनी काॅंग्रेसवर टीका केली आहे.

प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेऊ – आमदार बालमुकुंद आचार्य 

कपाटांमध्ये 310 कोटींहून अधिक रक्कम सापडली आहे, जनतेला त्यांचे खोटे आरोप माहीत आहेत, सर्व तपासयंत्रणा त्यांच्याकडे जमा केलेले पैसे काढून घेतील, दोषींना शिक्षा होईल. संपूर्ण देशात जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आहे, तिथे त्यांनी लुटमार केली आहे, आम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेऊ, असा इशारा भाजपा आमदार बालमुकुंद आचार्य यांनीही काॅंग्रेसला दिला आहे. भाजपचे नवे आमदार बालमुकुंद आचार्य (Balmukund Acharya) यांनी काँग्रेस पक्ष आणि धीरज साहू यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्या वेळी ते बोलत होते.

(हेही वाचा – NIA: साकीब नाचनचे खलिस्तानी दहशतवादी आणि आयएसआयशी थेट संबंध)

याविषयी काँग्रेस (Congress) नेते अविनाश पांडे (Avinash Pandey) यांनी रांचीमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना स्पष्टीकरण दिले आहे. ही धीरज साहू (Dheeraj Sahu) यांची वैयक्तिक बाब आहे, पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे अविनाश पांडे म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.