Satara Judge Bribe : न्यायाधीशच अडकले लाचखोरीत; चौघांवर गुन्हा दाखल

191
Satara Judge Bribe : न्यायाधीशच अडकले लाचखोरीत; चौघांवर गुन्हा दाखल
Satara Judge Bribe : न्यायाधीशच अडकले लाचखोरीत; चौघांवर गुन्हा दाखल

फसवणुकीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या संशयिताला जामीन देण्यासाठी मध्यस्थामार्फत 5 लाखांची मागणी केल्याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात बुधवार, ११ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी ही कारवाई केली आहे. (Satara Judge Bribe)

तक्रारदार तरुणीच्या वडिलांचा सातारा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. या अर्जाबाबत मदत आणि जामीन करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

(हेही वाचा – महाविकास आघाडीतील आमदार, खासदार संपर्कात…? भाजपा प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांचा गौप्यस्फोट)

काय आहे प्रकरण ?

३० नोव्हेंबर रोजी संशयित आनंद खरात याने तक्रारदार युवतीच्या मोबाईलवर फोन करून वडिलांचा जामीन करायचा असेल तर 5 लाख रुपयांचा प्रोटोकॉल करावा लागेल, असे सांगितले. पैशाची मागणी झाल्याने आपण २ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पुणे येथे तक्रार केली. पुणे ‘एसीबी’ने तक्रार घेतल्यानंतर ३ डिसेंबर रोजी मी खरात यास भेटले. पुणे ‘एसीबी’ने या तक्रारीची पडताळणी केली असता, आनंद खरात व किशोर खरात हे दोघे जामीन अर्जाची पुढील सुनावणी १० डिसेंबर असल्याचे सांगताना आढळले. तसेच न्यायाधीशांची कोर्टात भेट घालून देतो, त्यावेळी ‘एमएसईबी’ हा कोडवर्ड वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१० डिसेंबरला संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासाेबत अनोळखी व्यक्तीने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखविली. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलमांन्वये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी, मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्याविरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. (Satara Judge Bribe)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.