Railway Compensation चे करोडो रुपये न्यायाधीश आणि वकिलांनी हडपले; ईडीची मोठी कारवाई

96

रेल्वे अपघातात (Train Accident) किंवा जमीन नुकसानभरपाईसाठी ज्या लोकांनी न्यायालयात दाद मागितली होती, त्या दाव्यांचे वकील आणि न्यायाधीश यांनी केलेला अपहार समोर आला आहे. (Railway Compensation) न्यायाधीश आणि वकिलांची मिळून ८.०२ कोटी रुपयांच्या एकूण २४ मालमत्ता जप्त केल्या आहेत. पाटणा, नालंदा, गया आणि नवी देहली येथे मालमत्ता आहेत. अशा प्रकारच्या ९०० दाव्यांत सुमारे १०.२७ कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. ईडीने (ED) पाटणा (Patna) येथील विशेष न्यायालयात याची तक्रार दाखल केली आहे. यामध्ये अधिवक्ता विद्यानंद सिंह आणि इतरांना दोषी ठरविण्याची मागणी केली आहे. रेल्वे दावा न्यायाधिकरणमध्ये (Railway Claims Tribunal) फसवणूक केल्याचा आरोप या लोकांवर आहे.

(हेही वाचा – Kunal Kamra याच्यावर कठोर कारवाई करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळात ग्वाही)

काय आहे प्रकरण ?

वकील दावेदारांच्या नावे परस्पर बँकेत खाती खोलायचे. न्यायाधिशांच्या साथीने कोर्टाचा निकाल दावेदाराच्या नावे लावून घ्यायचे, यानंतर दाव्याची रक्कम या नव्याने खोलण्यात आलेल्या खात्यांत वळती केली जायची. ती रक्कम आली की, त्यातील मोठी रक्कम ते आपल्या खात्यात वळती करून कमी रक्कम दावेदारांना द्यायचे. यासाठी दावेदारांच्या सह्या आणि हाताच्या ठशांचा वापर करण्यात आला. कोर्टात अनेक कागदपत्रांवर सही आणि अंगठा द्यायचा असतो. वकील त्या कागदपत्रांत बँकांची कागदपत्रे घुसवून दावेदारांकडून सही आणि ठसे घेत होते. अशा प्रकारे पैशांची अफरातफर करण्यात आली होती.

वकिलांनी हे पैसे वळते करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले होते. काहींनी आपल्या पत्नींच्या नावे संपत्ती खरेदी केली, काहींनी कंपनी दाखवून तिकडे पैसे ट्रान्सफर केले. ईडीने या प्रकरणात वकीलच नाही, तर न्यायाधीश आर के मित्तल यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे मारले आहेत. ईडीने वकील विद्यानंद सिंह, परमानंद सिन्हा, विजय कुमार यांना अटक केली आहे. सध्या हे सर्वजण कारागृहात आहेत. आता न्यायाधिशांवरही कारवाईचा फास आवळला जाणार आहे. (Railway Compensation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.