न्‍यायपालिका हा विरोधी पक्ष नाही; राहुल गांधींशी वाद घालायचा नाही; निवृत्त सरन्यायाधीश Dhananjay Chandrachud यांची स्पष्टोक्ती

53
न्‍यायपालिका हा विरोधी पक्ष नाही; राहुल गांधींशी वाद घालायचा नाही; निवृत्त सरन्यायाधीश Dhananjay Chandrachud यांची स्पष्टोक्ती
न्‍यायपालिका हा विरोधी पक्ष नाही; राहुल गांधींशी वाद घालायचा नाही; निवृत्त सरन्यायाधीश Dhananjay Chandrachud यांची स्पष्टोक्ती

न्‍यायपालिका ही कायद्यांचा आढावा घेण्‍यासाठी असते आणि लोकशाहीत राजकीय विरोधकांना वेगळे स्‍थान असते. न्‍यायपालिका हा विरोधी पक्ष नाही. त्‍यामुळे मला राहुल गांधींशी (Rahul Gandhi) वाद घालायचा नाही. मला सध्‍या न्‍यायालयीन कामांपासून दूर रहायचे आहे. मला शिकवायचे आहे, मला तरुणांशी संपर्क साधायचा आहे, असे परखड मत निवृत्त न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी व्यक्त केले आहे. ते ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्‍थेच्‍या एका मुलाखतीत बोलत होते.

(हेही वाचा – Bangladesh मध्ये इस्कॉनचे चिन्मय प्रभु यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंवर धर्मांधांचा गंभीर हल्ला; ५० आंदोलक जखमी)

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, ‘आता विरोधी पक्षांनाही (Opposition Party) न्‍यायव्‍यवस्‍थेचे (Indian Judiciary) काम करावे लागत आहे’, या वक्‍तव्‍याविषयी त्‍यांचे मत विचारले असता चंद्रचूड यांनी हे उद्गार काढले. राहुल गांधी यांनी अलीकडेच म्‍हटले होते की, आम्‍ही प्रसारमाध्‍यमे, अन्‍वेषण संस्‍था आणि न्‍यायपालिका यांच्‍या वतीने एकट्याने काम करत आहोत. हे भारताचे वास्‍तव आहे. माजी सरन्‍यायाधीश चंद्रचूड यांना हा प्रश्‍न विचारण्‍यात आला तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘न्‍यायव्‍यवस्‍थेने विधीमंडळात विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे, असा अनेकदा गैरसमज असतो, जो खरा नाही. आम्‍ही येथे कायदे तपासण्‍यासाठी आहोत.’’

चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) पुढे म्हणाले की, कार्यकारी मंडळाची कारवाई कायद्याच्‍या अनुषंगाने आहे कि नाही आणि ती राज्‍यघटनेशी सुसंगत आहे कि नाही, हे पहाण्याची जबाबदारी न्‍यायपालिकेवर सोपवण्‍यात आले आहे. काही लोक न्‍यायपालिकेच्‍या खांद्यांवरून इतरांवर लक्ष्य साधण्‍याचा प्रयत्न करतात आणि न्‍यायालयाला राजकीय विरोधाचे ठिकाण बनवण्‍याचा प्रयत्न करतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.