Jumbo Mega Block News : येत्या विकेन्डला लोकलच्या ९३० फेऱ्या रद्द, रेल्वे म्हणते वर्क फ्रॉम होम द्या

Jumbo Mega Block कालावधीत तिन्ही दिवशी एकूण ९३० लोकल फे-या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल प्रवाशांची होणारी गैरसोय पहाता नोकरदारांना वर्क फ्रॉर्म होम करू देण्याची विनंती मध्य रेल्वे प्रशासनाने (Central Railway Administration) कार्यालयांना केली आहे.

444
Mega Block News Mumbai : मुंबईत 63 तासांच्या 'मेगाब्लॉक'ला विरोध, शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे मागितली सार्वजनिक सुट्टी
Mega Block News Mumbai : मुंबईत 63 तासांच्या 'मेगाब्लॉक'ला विरोध, शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे मागितली सार्वजनिक सुट्टी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील फलाटांच्या रुंदीकरणासह ठाणे येथील फलाटांच्या कामासाठी ३१ मे ते २ जून या कालावधीत शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Jumbo Mega Block News) या ब्लॉक कालावधीत तिन्ही दिवशी एकूण ९३० लोकल फे-या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल प्रवाशांची होणारी गैरसोय पहाता नोकरदारांना वर्क फ्रॉर्म होम करू देण्याची विनंती मध्य रेल्वे प्रशासनाने (Central Railway Administration) कार्यालयांना केली आहे. जेणेकरून या काळात लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या कमी होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

(हेही वाचा – Mumbai University Ground : मुंबई विद्यापीठाच्या मैदानावर क्रीडा सुविधा कशा मिळवायच्या?)

१ जूनच्या मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून २ जूनच्या दुपारी १२.३० पर्यंत यासाठी ब्लॉक घेतला जाईल. त्यात आता यात ठाणे येथील फलाटाच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे.

काय आहे कारण ?

सीएसएमटी येथे २४ डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबवता याव्यात, म्हणून फलाट क्रमांक १० आणि ११ चा विस्तार केला जात आहे. मध्य रेल्वेकडून हे काम पूर्ण करण्यासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सीएसएमटी येथील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या बहुतांशी मेल/एक्सप्रेस रद्द तर अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. याच कामाचा पुढचा टप्पा म्हणून आता लोकलचा (Mumbai local) ब्लॉक घेतला जाणार आहे. आता याचा फटका लोकल गाड्यांनाही बसणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर दररोज १ हजार ८१० लोकल फे-या धावतात. मात्र आता तिन्ही दिवसांच्या ब्लॉकमुळे एकूण ९३० लोकल फे-या रद्द होणार असल्याने प्रवाशांची अतोनात हाल होणार आहेत.

किती फेऱ्या होणार रद्द

या कालावधीत शुक्रवारी लोकलच्या १६१ फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत, ७ फेऱ्या अंशतः रद्द करण्यात येणार आहेत. शनिवारी ५३४ फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत, तर ३०६ / ३०७ फेऱ्या अंशतः रद्द करण्यात येणार आहेत. तसेच रविवारी २३५ फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या दिवशी अंशतः रद्द करण्यात येणाऱ्या फेऱ्यांची संख्या १३१ / १३९ अशी आहे. मध्य रेल्वे मार्गावर तिन्ही दिवशी एकूण ९३० लोकल फेऱ्या रद्द होतील. (Jumbo Mega Block News)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.