मध्य रेल्वे (Central Railway), मुंबई विभागाने रविवार ०९ जानेवारी २०२५ रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक (Mega block) घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी जंबो मेगाब्लॉक (Western Railway Jumbo Megablock) जाहीर करण्यात आला आहे. ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गांवर शनिवार/रविवार रात्री १०:०० ते सकाळी ११:०० वाजेपर्यंत १३ तासांचा हा ब्लॉक असेल. (Jumbo Mega block)
(हेही वाचा – दिल्ली निवडणूक निकालापूर्वी ACB ने केजरीवालांभोवती आवळला फास; ब्युरोने विचारले ‘हे’ पाच प्रश्न)
माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्ग सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०
सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.
सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२७ वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० पर्यंत अप आणि डाउन हार्बर मार्गावर
सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाउन सेवा रद्द राहतील.
सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत गोरेगाव/वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉकच्या कालावधीमध्ये पनवेल – कुर्ला – पनवेल या दरम्यान विशेष सेवा ट्रेन चालवल्या जातील. हार्बर लाईनच्या प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि वेस्टर्न लाईन स्टेशनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
(हेही वाचा – मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीविषयी Uddhav Thackeray यांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले.,.)
पश्चिम रेल्वेवर तब्बल १३ तासांचा मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेने ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी १३ तासांचा जम्बो मेगाब्लॉक जाहीर केला आहे, ज्यामुळे ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्टेशन दरम्यान शनिवारी रात्री १०:०० ते रविवारी सकाळी ११:०० वाजेपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गांवर परिणाम होईल. या काळात, ट्रॅक देखभाल, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांचे काम केले जाईल, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी, शनिवार/रविवार, ०८/०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रात्री २२.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद लाईनवर १३ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.#WRUpdates#MumbaiLocals… pic.twitter.com/0oeqp4zOns
— Western Railway (@WesternRly) February 7, 2025
ब्लॉक दरम्यान चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्टेशन दरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर धावतील. तसेच प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी वेळापत्रक तपासण्याचा आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला पश्चिम रेल्वे तर्फे देण्यात आला आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community