Teachers Day : अनेक मागण्यांसाठी शिक्षक दिनी प्राध्यापक करणार ‘काळी फित’ आंदोलन

कनिष्ठ महाविद्यालयातील महासंघाचा निर्णय

106
Teachers Day : अनेक मागण्यांसाठी शिक्षक दिनी प्राध्यापक करणार 'काळी फित' आंदोलन
Teachers Day : अनेक मागण्यांसाठी शिक्षक दिनी प्राध्यापक करणार 'काळी फित' आंदोलन

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकदिनी (Teachers Day), मंगळवारी (५ सप्टेंबरला) काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा पवित्रा घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना काळ्या फिती लावून निवेदन सादर करण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी जाहीर केला आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्य सरकारने वाढीव पदांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता व वेतन द्यावे, आयटी शिक्षकांना वेतनश्रेणीत वेतन द्यावे, शिक्षकांना १०, २०, ३० वर्षांची आश्वासित योजना लागू करावी, वर्गातील विद्यार्थी संख्या शाळा संहितेतील तरतुदीनुसार असावी, आदी मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्र्यांनी महासंघाशी चर्चा करून या मागण्यांची तत्काळ पूर्तता करावी, अशी मागणी महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी केली आहे. तसेच, सरकारकडून अशीच चालढकल चालू राहिली, तर आंदोलनाची मालिका उभारण्याचे महासंघाने ठरवले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

(हेही वाचा : Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी विशेष कारागृहातून मुक्त होण्याला 100 वर्षे पूर्ण, ‘हॅलो सह्याद्री’ कार्यक्रमाद्वारे स्मृतींना उजाळा)

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला होता. यावेळी राज्य सरकारने मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांना दिले होते. सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेत उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण केले. मात्र या मागण्यांवर सरकारने अद्याप कोणताही आदेश काढला नाही. तसेच महासंघाने वारंवार भेटी घेऊन, निवेदने देऊनही शिक्षण विभाग केवळ वेळ काढत आहे. त्यामुळेच शिक्षकदिनी काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही पहा : 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.