Justice Fathima Beevi : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती होत्या फातिमा बिवी; वयाच्या ९६ व्या वर्षी मालवली प्राणज्योत

184
Justice Fathima Beevi : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती होत्या फातिमा बिवी; वयाच्या ९६ व्या वर्षी मालवली प्राणज्योत
Justice Fathima Beevi : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती होत्या फातिमा बिवी; वयाच्या ९६ व्या वर्षी मालवली प्राणज्योत

भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पहिल्या महिला होण्याचा मान फातिमा बिवी (Justice Fathima Beevi) यांना मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या भारताच्या पहिला महिला न्यायमूर्ती एम. फातिमा बिवी यांचे निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून जेव्हा त्या निवृत्त झाल्या, त्यानंतर त्या तमिळनाडूच्या (Tamil Nadu) राज्यपालपदीही विराजमान झाल्या होत्या. राजकीय क्षेत्रातही त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला होता. (Justice Fathima Beevi)

(हेही वाचा – Shubham Gupta Martyred : घरी लग्नाची तयारी; कॅप्टन शुभम गुप्ता यांचे दहशतवाद्यांशी दोन हात आणि कुटुंबावर शोककळा)

१९५० मध्ये कारकीर्दीला सुरुवात

केरळच्या पंडालममधील न्यायमूर्ती बिवी यांनी तिरुवनंतपुरममधून (Thiruvananthapuram) विज्ञान शाखेची पदवी घेतली. त्याआधी त्या पथनामथिट्टा कॅथलिक शाळेत गेल्या. त्यानंतर त्यांनी सरकारी विधी महाविद्यालयातून वकिलीची पदवी घेतली. १४ नोव्हेंबर १९५० या दिवशी त्या वकील झाल्या. १९५० मध्ये केरळच्या कनिष्ठ न्यायालयातून त्यांनी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मॅजिस्ट्रेट आणि जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशही झाल्या. १९८३ मध्ये त्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती झाल्या. १९८९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. (Justice Fathima Beevi)

विविध पुरस्कारांनी गौरव

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायमूर्ती होण्याचा मान त्यांनी मिळवला. आशिया खंडातल्या देशांमधल्याही त्या पहिल्या महिला न्यायमूर्ती होत्या. १९९० मध्ये त्यांना डी. लिट या पदवीने आणि ‘महिला शिरोमणी’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांना ‘भारत ज्योती पुरस्कार’ही प्रदान करण्यात आला होता. तमिळनाडू राजभवनाच्या ‘एक्स’ खात्यावर ही पोस्ट करण्यात आली आहे. (Justice Fathima Beevi)

(हेही वाचा – MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष १८ दिवसांतच सुनावणी आटोपणार)

फातिमा बिवी यांना त्यांच्या वडिलांनी त्यांना कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. १९५० मध्ये जेव्हा त्यांनी कायद्याची पदवी घेतली, त्यात त्यांना सुवर्ण पदक मिळाले होते. बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे सुवर्ण पदक मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. (Justice Fathima Beevi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.