न्यायिक नैतिकता आणि प्रामाणिकपणा हे न्यायप्रणालीचे आधारस्तंभ आहेत. न्यायाधीश न्यायासनावर असो किंवा अन्यत्र कुठेही असो, त्याचे वर्तन हे न्यायिक नैतिकतेच्या उच्च मूल्यांना अनुसरूनच असायला हवे. पिठासीन असताना किंवा नसतानाही एखाद्या न्यायाधीशाने राजकारणी किंवा एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याची स्तुती केल्याने जनतेच्या मनात संपूर्ण न्यायपालिकेबद्दलच साशंकता निर्माण होण्याची भीती असते, असे मत सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) न्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले आहे. शनिवारी गुजरात येथे न्यायालयीन अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक परिषदेमध्ये ते बोलत होते. (Justice Gavai)
(हेही वाचा – Ind vs NZ, 2nd Test : भारताच्या आक्रमक क्रिकेटची कर्णधार रोहितने केली पाठराखण )
लिंगभाव, धर्म-जाती किंवा राजकारण यांसारख्या संवेदनशील विषयांवर एखाद्या खटल्याच्या व्यासापलीकडे जाते, तेव्हा न्यायाधिशांकडून विधाने केली जातात, तेव्हा ती चिंतेची बाब आहे. न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास टिकविणे आवश्यक आहे, अन्यथा अधिकृत न्यायप्रणालीव्यतिरिक्त अन्य मार्गानी न्याय मिळविण्याकडे नागरिकांचा ओढा वाढण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ सुरू असलेले खटले आणि संथगतीने सुरू असलेली न्यायालयीन प्रक्रिया यामुळे नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण होऊ शकतो.
खटल्याच्या निकालांना उशीर झाल्यास निष्पक्षपणे खटला चालविणे अवघड होते. त्याचप्रमाणे न्यायपालिकेवरील विश्वासालाही तडा जाऊ शकतो. न्यायपालिकेच्या कामकाजात राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेप झाल्यास न्यायपालिकेच्या स्वायत्ततेला आणि निष्पक्षपातीपणाच्या संकल्पनेलाच खीळ बसते, असे न्यायमूर्ती गवई यांनी म्हटले आहे. (Justice Gavai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community