Justice Rohit Deo : न्यायमूर्ती रोहित देव यांचा तडकाफडकी राजीनामा

212
Justice Rohit Deo : न्यायमूर्ती रोहित देव यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव (Justice Rohit Deo) यांनी आज, शुक्रवारी (४ ऑगस्ट) आपल्या पदाचा राजीनामा दिला. भर कोर्टात राजीनाम्याची घोषणा करून न्यामूर्ती देव निघून गेले. मात्र त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

न्यायमूर्ती देव (Justice Rohit Deo) यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होण्यापूर्वी राज्याचे महाधिवक्ता व केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून १९८६ मध्ये एलएल. बी. पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे कार्य केले. त्यानंतर १९९० पासून त्यांनी स्वतंत्रपणे वकिली व्यवसायाला सुरुवात केली. तब्बल ३० वर्षांच्या वकिली व्यवसायात त्यांनी विविध प्रकारची प्रकरणे हाताळली होती.

(हेही वाचा – MMRDA : एमएमआरडीएने भरले मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे)

न्यायमूर्ती देव (Justice Rohit Deo) यांची ५ जून २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सुमारे २ वर्षांच्या सेवेनंतर त्यांना न्यायमूर्ती पदी कायम करण्यात आले होते. त्यांच्या निवृत्तीला असून दीड वर्ष शिल्लक होते. आगामी ४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचा सेवाकाल समाप्त होणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला.

न्यायमूर्ती रोहित देव (Justice Rohit Deo) आज, शुक्रवारी नेहमीप्रमाणे कोर्टात आले. यावेळी त्यांनी उपस्थित वकिलांना पदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी भावनिक होऊन आपले मन मोकळे करताना आपण सर्व एक परिवार आहोत आणि परिवाराचा विकास व्हावा हाच आपला नेहमी उद्देश होता, असे वकिलांना सांगितले. तसेच, सर्वांना चांगले काम करीत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर ते संपूर्ण दिवसाचे कामकाज रद्द करीत असल्याचे सांगून स्वत:च्या कक्षात निघून गेले. दरम्यान, न्यायमूर्ती रोहित देव यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा करतानाच भर कोर्टात माफीही मागितली. आपण सर्वांनी इथे काम करताना खूप मेहनत घेतली. माझ्या मनात तुमच्या कुणाबद्दलही राग किंवा वाईट भावना नाही. पण मी जर अनवधानाने तुम्हा कुणाला दुखावले असेल, तर त्यासाठी मी आपली माफी मागतो अशा शब्दात देव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.