कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येवरून पुन्हा बरळले आहेत. त्यांनी दहशतवादी हरदीप सिंग याच्या हत्येमागे भारत सरकारला जबाबदार धरले आहे.
एका पत्रकाराने त्यांना दहशतवादी हरदीप सिंग यांच्या मृत्यूच्या तपासाबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही, याविषयी प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी कॅनडाच्या संसदेत भारतावर आरोप केले आहेत. या हत्येमागे भारत सरकारच्या एजंट्सचा समावेश असू शकतो, असे म्हटले आहे.
जस्टीन ट्रुडो यांनी म्हटले आहे की, आम्हाला आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून कॅनडाच्या एका नागरिकाच्या हत्येमागे भारत सरकार जबाबदार आहे. आमच्या देशाच्या भूमीवर आमच्याच नागरिकाची हत्या करण्यात विदेशी सरकारचा सहभाग असणं अस्वीकार्य आहे आणि हे आमच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे.
(हेही वाचा –Gajanan Kirtikar : वेळीच तोंड आवरावे…रामदास कदमांना गजानन किर्तीकर यांचा इशारा ! )
कॅनडा सरकारने भारतीय राजनैतिक अधिकारी पवन कुमार राय यांची हकालपट्टी केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तालयातून एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रुडो यांनी भारतावर केलेला आरोप भारतानेही फेटाळून लावला आहे.
कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना खासदार चंदन आर्य यांनी पार्लमेंट हिलवरील एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आम्ही भारत सरकारशी संपर्क साधला आहे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कॅनडाच्या अधिकाऱ्याचा वाढता हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांमध्ये त्यांच्या सहभागाबद्दल भारत सरकारची चिंता वाढली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community