बाल न्याय मंडळाचा निर्णय पाहून धक्का बसला: पुणे अपघात प्रकरणी DCM Devendra Fadnavis अॅक्शन मोडवर

पुण्यातील अपघात प्रकरणाची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. दोषींवर कडक करवाई करा, अशा सुचना त्यांनी पुणे पोलीस आयुक्ताना दिल्यात.

223
बाल न्याय मंडळाचा निर्णय पाहून धक्का बसला: पुणे अपघात प्रकरणी DCM Devendra Fadnavis अॅक्शनमोडवर

पुण्यात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. वेदांत चालवत असलेली पोर्शे कार तब्बल 200किमीच्या सुसाट वेगाने एका बाईकला धडकली होती. यामध्ये बाईकवर बसलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पोलिसांनी वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) याच्यावर कारवाई करण्यात चालढकल केली होती. त्यामुळे वेदांत अग्रवाल अवघ्या १५ तासांमध्ये जामिनावर बाहेर आला होता. वेदांत अग्रवाल हा पुण्यातील मोठेउद्योजक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा मुलगा आहे. त्यामुळेच पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई झाल्याचा आरोप झाला होता. याच संबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी अचानक पुणे येथील पोलिस आयुक्तालयात अचानक भेट देत आढवा घेतला आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधला.  (DCM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : दिल्लीत उष्णतेची लाट; मतदानावर परिणाम होण्याची शक्यता)

दरम्यान, पुणे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले की, पुणे पोलिसांनी योग्य कारवाई केली असून, पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला (Juvenile Justice Board) दिले. पण तरीही बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक होता. मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत, अर्ज सबमिट केला होता. त्यात अतिशय स्पष्टपणे कलम ३०४ (Act 304) नमूद आहे. तसेच स्पष्टपणे लिहिलं आहे की, हा जो मुलगा आहे तो १७ वर्षे ०८ महिन्यांचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही कायद्यात दुरुस्ती झाली आहे आणि १६ वर्षाच्या वरचे जे मुलं असतील त्यांना हेनियस क्राईममध्ये (Heinous Crime) अडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं. माझ्याकडे रिमांड अॅप्लिकेशनही आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. (DCM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – पासपोर्ट जप्त करा, उद्धव ठाकरे ४ जूननंतर लंडनला जाणार; Nitesh Rane असे का म्हणाले?)

बाल न्यायालयाची भूमिका प्रश्नचिन्ह निर्माण करणारी

फडणवीस म्हणाले की, कलम 304 A नाही तर हा कलम 304 च आहे. अशा प्रकारे पोलिसांनी केलं होतं. दुर्देवाने बाल न्याय मंडळाने वेगळी भूमिका घेतली आणि अडल्ट ट्रीट करण्याचा अर्ज बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियल्ट अशाप्रकारचा व्ह्यू घेत १५ दिवस सोशल सर्व्हिस करा, अशाप्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या. खरं म्हणजे हा पोलिसांकरता एक धक्का होता. कारण पोलिसांनी सर्व पुरावे दिले आहेत. कुठल्या हॉटेलमध्ये तो होता, काय केलं आहे, गाडीचे पुरावे दिले आहेत, तरी देखील त्याकडे न्यायालयाने दुर्लक्ष केले.  (DCM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Traffic Police : अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन द्याल तर तुरुंगात जाल)

पालकांना देखील आवाहन

फडणवीस म्हणाले की, बाल न्याय मंडळअंतर्गत पालकावर पहिली कारवाई केली जातेय, हे पालकांनी लक्षात ठेवावं. पालकांनी आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल असं पाहिलं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा हिनियस क्राईम आहे, स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नाही हे पालकांनी आपल्या मुलांना सांगावं अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. (DCM Devendra Fadnavis)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.