महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याची घोषणा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. या वेळी त्यांनी केलेल्या भाषणात महादजी शिंदे (Mahadji Shinde) यांच्या शौर्याचा उल्लेख केला. मुख्यमंत्री फडणवीस यांचे हे भाषण महादजी शिंदे यांचे वंशज आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी त्यांच्या X अकाऊंटवर पोस्ट केले आहे.
(हेही वाचा – CM Medical Assistance Cell च्या मदतीने चिमुकल्याच्या मेंदूची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण; आई म्हणाली, आमच्यासाठी…)
या वेळी महादजी शिंदे यांच्या शौर्याचे वर्णन करतांना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, “अहमदशाह अब्दाली याने पानीपतची लढाई जिंकल्यानंतर १० वर्षांनी महादजी शिंदे यांनी दिल्ली पुन्हा जिंकली आणि एकछत्री अंमल आणला. महत्त्वाचे हे आहे की, अहमदशाह अब्दाली पानीपतची लढाई (Battle of Panipat) जिंकला असे म्हटले जात असले, तरी पानीपत जिंकूनही अहमदशाह अब्दाली (Ahmad Shah Abdali) देशात थांबलाच नाही. पानीपतची लढाई जिंकून तो देशाचा अनभिषिक्त राजा झाला होता, मात्र मराठ्यांनी त्याचे हौसले इतके फस्त केले होते की, तो आपल्या देशात निघून गेला. म्हणून पानीपतच्या लढाईमध्ये आमचा पराभव झाला, असे आम्ही म्हणत नाही. त्यातून धडा घेऊन महादजी शिंदे यांनी भगवा ध्वज पुन्हा दिल्लीवर रोवला.”
“महाराज महादजी शिंदे यांनी पानिपतच्या युद्धातून प्रेरणा घेत इब्राहिम दुर्राणीला अक्षरशः पिटाळून लावत पुन्हा दिल्ली काबीज करत संपूर्ण भारतावर मराठ्यांचे एकसंघ राज्य स्थापन केले!”
– माननीय श्री @Dev_Fadnavis जी, मुख्यमंत्री, महाराष्ट्र pic.twitter.com/mYC0EkV7Ys— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) March 27, 2025
मराठ्यांचा आणि महादजी शिंदे यांचा पराक्रम सांगणारे हे भाषण सामाजिक माध्यमांमध्ये व्हायरल झाले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही ते पोस्ट केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community