Kala Ghoda परिसर सप्टेंबरपासून पादचारी क्षेत्रात बदलणार

Kala Ghoda : मुंबईतील पहिला 'फक्त पादचारी' परिसर, बीएमसीच्या काळा घोडा सुशोभीकरण योजनेचा भाग

152
Kala Ghoda परिसर सप्टेंबरपासून पादचारी क्षेत्रात बदलणार
Kala Ghoda परिसर सप्टेंबरपासून पादचारी क्षेत्रात बदलणार

दक्षिण मुंबई परिसरातील काळा घोडा (Kala Ghoda) परिसर प्रथमच “फक्त पादचारी” झोनमध्ये सप्टेंबरपासून बदलणार आहे. सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी होणार असून त्यादृष्टीने बीएमसी उचित पावले टाकत असून ते लवकरच पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आहे. हा बीएमसीच्या काळा घोडा सुशोभीकरण योजनेचा एक भाग आहे.

(हेही वाचा- Kolkata येथील घटनेनंतर गृहमंत्रालय सतर्क; घेतला ‘हा’ निर्णय)

कुलाब्यातील भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर म्हणाले की, काळा घोडा (Kala Ghoda) हे शनिवार व रविवारी संध्याकाळी मुंबईतील पहिले वाहनमुक्त पादचारी क्षेत्र ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे स्थानिक आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या नेतृत्वाखाली कुलाब्यातील अनेक सुशोभीकरण योजनांपैकी ही पहिलीच योजना आहे.

काळा घोडा (Kala Ghoda) हा मुंबईचा कला परिसर आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी आर्ट आणि इलियाहू सिनेगॉग आहे. या रस्त्यांवर पर्यटन वाढवण्याची ही योजना आहे, असे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आणि भाजपाचे स्थानिक आमदार यांनी “फक्त पादचारी” झोनमागील कल्पना स्पष्ट करताना सांगितले.

(हेही वाचा- दहशतवादासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र या; ग्लोबल साउथ देशांना PM Modi यांचे आवाहन)

माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर (Makarand Narvekar) पुढे म्हणाले की, आता या रस्त्यांचे सौंदर्य केवळ पाहता येत असल्याने त्याचा अनुभव लोकांना घेता यावा यासाठी ही योजना आहे. फोर्ब्स स्ट्रीट, रोप वॉक लेन, साईबाबा रोड, रदरफिल्ड स्ट्रीट आणि बी भरुचा रस्ता हे पाच अंतर्गत रस्ते या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये कोबल्ड पाथवे, वॉल पेंटिंग आणि रस्त्यावरील कलाकृती असतील. येथे आधीच कॅफे आणि रेस्टॉरंट्स आहेत. या ठिकाणाचा सांस्कृतिक आणि इतिहास समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत, नार्वेकर यांनी स्पष्ट केले. (Kala Ghoda)

मकरंद नार्वेकर पुढे म्हणाले की, वाहनमुक्त क्षेत्र ही संकल्पना नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद आणि व्हीझिटर्स यांना या संकल्पनेची ओळख करून देण्यासाठी वीकेंडमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाईल. नवीन फुटपाथ, पेंटिंग्ज आणि लाइट्स आणि बेंचसह जागा निश्चित करत आहोत. याठिकाणी लोक आराम करू शकतील आणि जवळपासच्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवून जेवणाचा आनंद घेऊ शकतील. जवळपासच्या भागात व्हीझिटर्ससाठी पुरेशी पार्किंगची जागा देखील पुरवली जाईल, असे नार्वेकर यांनी नमूद केले. (Kala Ghoda)

(हेही वाचा- खगोलप्रेमींसाठी Super Blue Moon पाहण्याची पर्वणी)

ते पुढे म्हणाले की, केवळ पादचारी मार्ग ही शहरासाठी एक नवीन संकल्पना आहे आणि या योजनेत सुधारणा करण्यासाठी अभिप्राय विचारात घेतले जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि विशेष गरजा असलेल्या लोकांसाठी, RFID आधारित वाहन प्रवेश असेल. प्रतिबंधित क्षेत्रात त्याची वेगमर्यादा 20 किमी/तास पेक्षा जास्त नसेल. नागरिकांना त्यांच्या जीवनातील उत्तम अनुभव मिळतील यासाठी अभिप्राय विचारत घेवून सुधारणा केल्या जातील, असे ते म्हणाले. (Kala Ghoda)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.