बांगलादेशात (Bangladesh) हिंदूंच्या श्रद्धास्थानावर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत. शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे सरकार सत्तेतून पायउतार होताच हिंदू (Hindu) मंदिरांवर हल्ले केले जात आहेत. जमालपुर जिल्ह्याच्या सरिसाबाडी उपजिल्ह्यात कामराबाद यूनियमजवळ काली मातेच्या मंदिरात दि. १३ डिसेंबर रोजी काही धर्मांधांनी हल्ला केला. त्यांनी मंदिरातील मूर्त्यांची ही तोडफोड केली. तसेत मूर्तींवरील आभूषणांची चोरी केली.
ऑपइंडिया या वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सरिसाबाडी उपजिल्ह्यात कामराबाद यूनियन येथील आहे. तेथील काली मंदिर (kali mata temple) स्थानिक हिंदूंच्या (Hindu) आस्थेचा केंद्र आहे. दि. १३ डिसेंबर रोजी काही कट्टरपंथींनी मंदिरात शिरून मंदिरातील मूर्त्यांची तोडफोड केली. मंदिरमधील ७ मूर्त्यांची तोडफोड करून विटंबना करण्यात आली आहे. तसेच काली मातेच्या मूर्तीचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले. (Bangladesh)
(हेही वाचा – Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारमध्ये कोणते नवे चेहरे असणार?)
तसेच धर्मांधांनी मूर्त्यांवरील आभूषणे, श्रृंगारांची लूट केली. दि. १३ डिसेंबर रोजी मंदिराचे अध्यक्ष उत्तम कुमार तिवारी (Uttam Kumar Tiwari) मंदिरात (kali mata temple) आले तेव्हा त्यांना सर्व प्रकार कळला. उत्तम कुमार यांनी सांगितले की, हा प्रकार कोणी केला माहिती नाही, मात्र ज्याने कोणी हा प्रकार केला त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मंदिर प्रबंधनने तक्रार केल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. (Bangladesh)
दरम्यान यासंपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, मंदिरातील मूर्त्या अस्ताव्यस्थ पडलेल्या आहेत. तसेच अनेक मूर्त्यांचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले आहे. याप्रकरणी हिदूंनी (Hindu) आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. तरी अद्याप हल्लेखोरांबद्दल पोलिसांना कोणतीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (Bangladesh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community