ठाणे येथील महानगरपालिकेच्या अखत्यारीतील कळवा रूग्णालयात Kalwa Hospital सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेनंतर मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसर अक्षरश: दणाणून सोडला.
यामुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण होते. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना बोलावले. शुक्रवारी संपूर्ण रुग्णालय परिसरात पोलिस तैनात होते. सहा मृत रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप रुग्णालय प्रशासनाने खोडून लावला.
(हेही वाचा : नागपूरमध्ये हवालदार पतीच्या मरणोत्तर पत्नीकडून अवयवदानाचा स्तूत्य उपक्रम)
नेमकी घटना काय?
ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील पालिकेच्या रुग्णालयात सहा रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला. या रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. रुग्णांचा मृत्यू झालेला असतानाही पाच तास विनाकारण अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार करण्याचे डॉक्टरांनी नाटक केले, असा आरोप त्यांनी केला. सहा रुग्ण अतिगंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर तातडीने अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. त्यांना वाचवण्याचे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले अशी बाजू रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अनिरुद्ध माळगावकर यांनी मांडली. रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता संपली आहे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठीही अतिरिक्त खाटा उपलब्ध नाही. रुग्णालयावर अतिरिक्त रुग्णसेवेचा ताण असूनही रुग्णालय प्रशासन रुग्णांना उत्तम दर्ज्याची रुग्णसेवा देत असल्याचे स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिले.
मृत्यू झालेले रुग्ण –
सहा मृत्यूपैकी दोन रुग्णांची ओळख अद्यापही पोलिसांकडून पटलेली नाही. उर्वरित चार रुग्णांची ओळख पटलेली नाही. भाऊराव गणेश सरडकर (३४), रवींद्र (३६) प्रमादेवी (६०) सुजोराम पाल (६६) या रुग्णांच्या नातेवाईकांनी आपला रुग्ण वैद्यकीय हलगर्जीपणामुळे मृत पावल्याचा आरोप केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community