सौर ऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचा ग्रीन ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धन पुरस्कार कल्याण-डोंबिवली महापालिकेला मिळाला आहे. इंडिया हॅबिटाट सेंटर, नवी दिल्ली येथे झालेल्या १२व्या ग्रीन एनर्जी समीटमध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे कल्याण-डोंबिवली महापालिकेला चौथा ग्रीन ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित केले.
देशस्तरावर सौर ऊर्जा आणि महापालिकेच्या विविध विभागांत ऊर्जा संवर्धन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवड करण्यात आली. महापालिकेच्या वतीने विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
(हेही वाचा – Dharavi redevelopment project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत खासदार राहुल शेवाळे स्पष्ट बोलले, म्हणाले… )
महिना अखेरीस विविध प्रकल्प होणार कार्यान्वित
महापालिकेने आधारवाडी येथील नवीन प्रशासकीय इमारतीवर २५ किलोवॅट क्षमतेचा रुफ टॉप नेट मीटर सौर प्रकल्प कार्यान्वित केला आहे. तसेच प्रभागक्षेत्र कार्यालय आणि आयुक्त निवासस्थान यांसह १० इमारतींवर १६० किलोवॅट क्षमतेचे रुफटॉप नेट मीटर सेंटर ऊर्जा निर्मिती प्रकल्पही या महिनाअखेरीस कार्यान्वित होत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community