Kalyan Railway Station वर पाण्याची बोंब; जाणून घ्या काय आहे कारण…

48

Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्टेशनची पाणी बिल (Water Bill) थकबाकी एकूण चार कोटी 41 लाखांची असल्यामुळे केडीएमसीने (KDMC) कल्याण रेल्वे स्टेशनचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. केडीएमसीने थकबाकी भरण्यासाठी रेल्वे प्रशासनाला (Railway Administration) वारंवार नोटीस आणि अल्टिमेटम दिले होते. मात्र, त्यानंतरही रेल्वेने थकबाकी न भरल्यामुळे केडीएमसीने रविवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. (Kalyan Railway Station)

केडीएमसीने मालमत्ता कर आणि जलकर थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. कल्याण रेल्वे स्थानकही या कारवाईच्या कचाट्यात सापडला आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर चालू वर्षाचे सुमारे 1 कोटी आणि गेल्या वर्षी सुमारे 3 कोटींचा समावेश असून एकूण 4.41 कोटी थकबाकी शिल्लक आहे.

(हेही पहा – Hindu : ‘ओम प्रमाणपत्र’ला आता ‘हिंदू ग्राहक जागृती अभियाना’ची जोड; गुढीपाडव्यापासून हिंदू ग्राहकांच्या नोंदणीला प्रारंभ)

24 तासांचा अल्टीमेट
तसेक अभय योजनेंतर्गत (Abhay Yojana) कल्याण रेल्वे स्थानकातील 31 लाख रुपयांचे पाणी बिल (water bill) माफ करण्यात आले आहे. मात्र, केडीएमसीने उर्वरित थकबाकी भरण्यासाठी रेल्वे प्रशासनाला नोटीस पाठवली होती. 24 तासांचा अल्टिमेटमही देण्यात आला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने थकबाकी न भरल्यामुळे केडीएमसीने अखेर कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणीपुरवठा खंडित केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.