कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणीला बेदम मारहाण

एक तरुणी रिक्षातून उल्हासनगरहून डोंबिवलीला निघाली. रिक्षातून प्रवास करत असताना तो रिक्षाचालक तिची छेड काढू लागला.

मंबईच्या बाजूलाच असलेल्या कल्याण येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. येथील कोळसेवाडी परिसरात शनिवारी रात्री एका तरुणीला आणि तिला वाचवण्यासाठी आलेल्या २ तरुणांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. कल्याण पश्चिमेकडील कोळसेवाडी पारिसरात काटेमानीवली नाक्यावर भररस्त्यात हा प्रकार घडला. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांना अटक केली.

हा अत्यंत क्रूर प्रकार आहे. पोलिसांचा हा नाकर्तेपणा आहे. जर अन्याय झालेल्यांना पोलिस ठाण्यात तासनतास बसून ठेवत आहेत आणि ज्यांनी मारहाण केली ते मात्र मोकाट आहेत. राज्यात महिला असुरक्षित बनल्या आहेत.
– चित्रा वाघ, उपाध्यक्ष, भाजप.

आधी रिक्षाचालकाने छेड काढली!

शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल  मीडियात व्हायरल होत आहे. एका तरुणीने उल्हासनगरहून डोंबिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्या रिक्षातून प्रवास करत असताना तो रिक्षाचालक तिची छेड काढू लागला. यानंतर त्या तरुणीने आपल्या दोन मित्रांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांना तातडीने संबंधित ठिकाणी येण्यास सांगितले. तिचे दोन्ही मित्र कल्याण, कोळसेवाडी पारिसरात पोहोचल्यानंतर त्यांचा रिक्षाचालकांशी वाद झाला. मात्र त्यानंतर त्या ठिकाणी जमाव जमला आणि त्यांनी त्या दोघांसह तरुणीला जमावाने पट्ट्याने बेदम मारहाण केली. जमावातील काही जणांनी संबंधित तरुणीचे केस पकडून तिलाही बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला.  दरम्यान या तरुणीसह तिच्या दोन मित्रांनी पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, मात्र शनिवारी सकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही, त्यामुळे तीव्र नाराजी पसरली.

(हेही वाचा : वारकरी बांधवांचे पायी वारी आंदोलन! बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here