एच पूर्व विभागातील परीक्षण खात्यातील सहाय्यक अभियंता अजय पाटील यांना शिवसेना (उबाठा) गटाच्या नेते आणि माजी नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी (२७ जून) एच -पूर्व कार्यालयात सर्व अभियंत्यांच्या संघटनांनी एकत्र येत याचा निषेध केला. मंगळवारी या कार्यालयातील तसेच २४ विभाग कार्यालयातील अभियंत्यांनी एकत्र येत याचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन केले. मात्र जोवर सर्व हल्लेखोर आणि त्यांचे सूत्रधार यांना अटक होत नाही तोवर हे ‘काम बंद आंदोलन’ सुरूच राहील असा इशारा अभियंता व कामगार संघटनांनी दिला आहे.
शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्यामधील सहभागी झालेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यानी विभागच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या दालनात धाव घेतली आणि तिथे आमची शाखा कोणी तोडली याचा जाब विचारण्यास सुरुवात केली. मुळात हा मोर्चा विभागातील दूषित पाणी पुरवठा आणि रस्त्यांची रखडलेली कामे आदी समस्यांबाबत होता आणि प्रत्यक्षात सहायक आयुक्त यांच्या दालनात शिरताच आमची शाखा कोणी तोडली अशा विचारणा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींना ते कार्यालय तोडण्यामागील कारणे पटवून देण्यासाठी लोकांच्या गर्दीतून पुढे येत असतानाच शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर हात उचलून त्याला मारहाण केली.
(हेही वाचा – मनपा आधिकरी मारहाण : अनिल परब सह पाच जणांवर गुन्हा दाखल, चौघांना अटक)
शासकीय कार्यलयात आणि सेवेत असताना ही मारहाण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून या घटनेमुळे अभियंता अधिकारी यांच्या सुरक्षेचा मुद्द्दा निर्माण झाला आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे कार्यध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी एच पूर्व विभागात ‘काम बंद आंदोलन’ करण्याचा इशारा दिल्यानंतर याला म्युनिसिपल मजदूर युनियन व म्युनिसिपल इंजिनीयर असोशियन संघटनेनेही पाठिंबा देत अधिकारी, अभियंता यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. यावेळी त्यांनी सर्व हल्लेखोरांना त्वरित अटक करावी. हल्ला करणाऱ्या राजकीय पक्षाचा त्यांनी निषेधही केला. एच पूर्व विभागातील सर्वच कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. मुन्सिपल मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी याचा निषेध व्यक्त करत राजकीय पक्षांनी त्यांचे राजकारण जरूर करावे. पण अशाप्रकारे एका अधिकाऱ्याला मारहाण करणे योग्य नसून जर ही शाखा किंवा कार्यालय जर अधिकृत होते, तर न्यायिक पद्धतीने त्याचे पुरावे सादर करायला हवेत. यासाठी महापालिकेच्या इतर यंत्रणाकडे दाद मागायला हवी. परंतु थेट मारहाण करणे योग्य नसून अशाप्रकारची मारहाण यापुढे आम्ही कामगार संघटना सहन करणार नाही. कामगार संघटना म्हणून आम्ही स्वतंत्र असलो तरी कामगार, अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा येईल तेव्हा आम्ही सर्व कामगार संघटना एकत्र येऊन त्याविरुद्ध लढा देऊ,वसे त्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community