काँग्रेसचे युवराज आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्याशी चर्चा केली, अशा बातम्या प्रसारित झाल्या आहेत. याविषयी आता पीटीआयने कमला हॅरिस यांच्या कार्यालयाचा दाखला देत हे वृत्त फेटाळले आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस राहुल गांधी यांच्याशी फोनवर बोलल्याच नाहीत, असे पीटीआयचे यूएस प्रतिनिधी ललित के झा (Lalit K Jha) यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
(हेही वाचा – Donald Trump यांच्यावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचे ट्वीट; म्हणाले…)
यापूर्वीच्या कमला हॅरिस आणि राहुल गांधी यांच्यातील संभाषणाची चर्चा दोघांनी गुरुवारी फोनवर बोलले असले, तरी त्यांच्या संभाषणाचा तपशील उघड करण्यात आलेला नव्हता. दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणाचा दावा करणाऱ्या वृत्ताला अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या कार्यालयाने ‘पूर्णपणे निराधार आणि चुकीचे’ असे म्हटले आहे.
This news is inaccurate as per office of the US Vice President. @KamalaHarris has not spoken with @RahulGandhi. https://t.co/Q4pRfPcfYy
— Lalit K Jha ललित के झा (@lalitkjha) July 13, 2024
वरिष्ठ अमेरिकन पत्रकार ललित के झा यांनी X वर म्हटले आहे की, “अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींच्या कार्यालयानुसार, ही बातमी खोटी आहे. कमला हॅरिस राहुल गांधींशी बोलल्या नाहीत. मात्र, राहुल गांधी आणि हॅरिस यांच्यात दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणाच्या बातम्यांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.”
राहुल गांधींचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न
ही खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, काँग्रेसच्या (Congress) सोशल मीडिया हँडलने या बातमीला दुजोरा दिलेला नाही किंवा नाकारले नाही. तथापि, पक्षाशी विशेष संबंध असलेल्या काही सोशल मीडिया अकाऊंटवरून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल गांधींचे महत्त्व जाणूनबुजून वाढवण्यात आल्याने खोट्या बातम्यांच्या प्रसाराविषयी पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराला आळा घालण्याची मागणी केली जात आहे.
अमेरिकेत आहे निवडणुकांचे वातावरण
राहुल गांधी आणि हॅरिस यांच्यातील दूरध्वनी संभाषण अशा वेळी झाले आहे, जेव्हा डेमोक्रॅटिक पक्षाचा एक गट भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जो बायडेन यांच्या जागी घेण्यास दबाव आणत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community