महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयात आयुष अंतर्गत कार्यरत सर्व वैद्यकीय अधिका-यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासन दुर्लक्ष करत राहिल्याने सोमवारी कामबंद आंदोलन पुकारले आहे. तसेच, मागण्यांची दखल न घेतल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना या संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यातील आरोग्य विभागाअंतर्गत येणा-या आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करणा-या राज्यातील 10 हजारांहून अधिक अरोग्य अधिका-यांनी 36 जिल्ह्यांमध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी कामबंद आंदोलन पुकारले आहे. जर सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा या आरोग्य अधिका-यांनी दिला आहे. यासंबंधी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर हे आरोग्य अधिकारी सोमवारी निदर्शने करणार आहेत.
( हेही वाचा: संस्कृतीदर्शक दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडला संपवणार )
मागण्या काय?
समुदाय आरोग्य अधिका-यांना अर्थात सीएचओ यांना शासकीय सेवेत कायम करुन ब वर्गाचा दर्जा देण्यात यावा, वेतन निश्चिती 36 हजार रुपये आणि कामावर आधारित वेतन 40 हजार रुपये करण्यात यावे, बदल्यांबाबत धोरण निश्चित करण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी सोमवारी हे आंदोलन करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community