आगीच्या दुर्घटनंतर गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेले मरोळ येथील कामगार रुग्णालय अखेरीस सुरु होणार आहे. या दुर्घटनेत इमारतीची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. कामगार रुग्णालय दोन वर्षांत सुरु करण्याचा मानस तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी दाखवला होता. प्रत्यक्षात कोविड काळात या बांधकामाला मोठी खिळ बसली. अखेरीस हे रुग्णालय सुरु होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.
मरोळ येथील कामगार रुग्ण बंद पडल्याने बरेचसे रुग्ण कांदिवली येथील कामगार रुग्णालयात जाण्याऐवजी मरोळ येथील पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारांसाठी जात आहेत. अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालय २०१८ पासून बंद असून आगीच्या दुर्घटनेनंतर रुग्णालय तातडीने सुरु करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. आता या रुग्णालयाची स्थिती काय असल्याचे प्रश्नोत्तर काळात सदसय मनीषा कायंदे, सुनील शिंदे, सचिन अहिर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी रुग्णालय बंद असल्याची बाब मान्य करून आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी हे रुग्णालय ऑगस्टपर्यंत पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेत दिली.
(हेही वाचा – Reserve Bank : व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय)
दरम्यान, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या अधिनस्थ राज्य विमा निगम महामंडळाने ही इमारत दुरुस्तीसाठी रिकामी केली आहे. या रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम मे. एनबीसीसी या कंपनीला दिले आहे. या रुग्णालयातील इतर सेवा तात्पुरत्या स्वरूपात कांदिवली कामगार रुग्णालयात हलविण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाच्या अग्नी सुरक्षेसाठी ना हरकत प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा करत असल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले. अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यावर उर्वरित दुरुस्ती सुरु होईल. मात्र, हे काम पूर्ण होऊन ऑगस्टपर्यंत सुरु करण्याचे नियोजन असल्याचे सावंत म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community