Kanchanjunga Express Train Accident १५ जणांचा मृत्यू, ६० जखमी; पंतप्रधान मोदींकडून आर्थिक मदत जाहीर

146
Kanchanjunga Express Train Accident १५ जणांचा मृत्यू, ६० जखमी; पंतप्रधान मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
Kanchanjunga Express Train Accident १५ जणांचा मृत्यू, ६० जखमी; पंतप्रधान मोदींकडून आर्थिक मदत जाहीर

पश्चिम बंगालमध्ये मालगाडीने कंचनजंगा एक्सप्रेसला (Kanchanjunga Express Train Accident) धडक दिल्याने रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास न्यू जलपाईगुडी येथे ही घटना घडली. दरम्यान, मालगाडीने धडक दिल्यानंतर कंचनजंगा एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले होते. (Kanchanjunga Express Train Accident)

मालगाडी अगरतलावरून सियालदाह येथे जात होती. यावेळी या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक (Kanchanjunga Express Train Accident) दिली. ही धडकी इतकी जोरदार होती, की यावेळी कंचनजंगा एक्सप्रेसचे दोन डबे थेट रुळावरून खाली घसरले. या अपघातात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच या ठिकाणी रेक्यू टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे थोड्याच वेळात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) देखील घटनास्थळी दाखल होणार आहेत. (Kanchanjunga Express Train Accident)

पश्चिम बंगालमध्ये झालेला रेल्वेचा अपघात दुर्दैवी- पंतप्रधान नरेंद्र मोदी

या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही प्रतिक्रिया दिली. पश्चिम बंगालमध्ये झालेला रेल्वेचा अपघात दुर्दैवी आहे. या अपघातात ज्यांच्या मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच जे लोक जखमी झालेत, ते लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच याप्रकरणी माझं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्रीही लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहेत. असेही त्यांनी सांगितले. याशिवाय पंतप्रधान मोदींनी या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचीही घोषणा केली. (Kanchanjunga Express Train Accident)

रेल्वे मंत्रीही लवकरच घटनास्थळी पोहोचणार

रेल्वेमंत्र्यांनी या अपघातानंतर सोशल मीडिया पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. तसेच घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली होती. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत, असंही त्यांनी सांगितले होतं. (Kanchanjunga Express Train Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.