पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे सोमवारी, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मालगाडीने कांचनगंगा एक्सप्रेसने (१३१७४) (Kanchanjunga Train) ला मागून धडक दिली. ही एक्सप्रेस आगरतळाहून पश्चिम बंगालमधील सियालदहला जात होती. या अपघाताबाबत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केले आहे.
The news of the loss of lives due to a train accident in Darjeeling, West Bengal is deeply distressing. My thoughts and prayers are with the bereaved families. I pray for the speedy recovery of the injured and success of relief and rescue operations.
— President of India (@rashtrapatibhvn) June 17, 2024
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सोशल मीडिया ‘X’वर पोस्ट करून म्हटले आहे की, ‘पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झालेल्या रेल्वे अपघातातील जीवितहानीची बातमी अत्यंत दुःखद आहे. माझे विचार आणि प्रार्थना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात. मदत आणि बचाव कार्याला यश मिळावे, यासाठी मी प्रार्थना करते.’
या अपघातात कांचनगंगा एक्सप्रेसच्या ३ मोठ्या डब्यांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जखमींना नेण्यासाठी बंगाल रोडवेजच्या बसेस रवाना झाल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community