Kandivali Shatabdi Hospital : कांदिवली शताब्दी रूग्णालयातील एन.आय.सी.यू.  पी.आय.सी.यू. खासगी नर्सेस 

2667
Kandivali Shatabdi Hospital : कांदिवली शताब्दी रूग्णालयातील एन.आय.सी.यू.  पी.आय.सी.यू. खासगी नर्सेस 
Kandivali Shatabdi Hospital : कांदिवली शताब्दी रूग्णालयातील एन.आय.सी.यू.  पी.आय.सी.यू. खासगी नर्सेस 
कांदिवली (Kandivali Shatabdi Hospital) येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण(शताब्दी) रुग्णालयात  एन.आय.सी.यू. व पी.आय.सी.यू. तसेच सर्वसाधारण सेवा शुश्रुषा यांकरिता खासगी तत्ववार परिचारिकांनी मदत घेतली जात असून तब्बल २९ परिचारिकांची सेवा कंत्राटी तत्वावर घेण्यात आली आहे. ही सेवा जून महिन्यापासून सहा महिन्यांच्या कालावधी करता घेण्यात आली. परंतु ही सेवा ३० नोव्हेंबर पर्यंत याचा कालावधी असताना प्रत्यक्षात कालावधी संपुष्टात आला तरी त्याला मंजुरी प्राप्त झाली नव्हती. त्यामुळे ही परवानगी वेळीच न घेता सहा महिन्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर ही मजुरी  घेतली जात असल्याने या कंत्राट कामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
कांदिवली  (Kandivali Shatabdi Hospital) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय डॉ. आंबेडकर रुग्णालयातील  मंजूर १६७ पदांपैकी  नियमित तत्वावरील परिचारिकांची ११ पदे ही  रिक्त आहेत. तसेच या रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या पी.आय.सी.यू. आणि निओनंटल ट्रान्झिश्नल केअर युनिटची सुविधा रुग्णसेवेकरीता कार्यान्वित करण्यासाठी परिचारिकांची  १८ पदे आवश्यक आहेत. रिक्त  पदे ११ आणि आवश्यतेनुसार १८ अशी एकूण २९ पदे तातडीने भरण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याने महापालिकेने खासगी संस्थेकडून या परिचारिकांनी सेवा घेण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचा-विनोदाला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवणारे Om Prakash)

रूग्णालय व्यवस्थापनाच्या (Kandivali Shatabdi Hospital) म्हणण्यानुसार, परिचारिकांचे कर्तव्य हा रुग्णसेवेचा कणा असल्याने ही पदे जास्त काळ रिक्त राहिली तर परिणामी रुग्णसेवेचे कामकाज विस्कळीत होते. म्हणून परिचारिका संवर्गाची एकूण २९ पदांची सेवा दरमहा प्रति उमेदवार ठोस मोबदला म्हणून ३०,००० रूपये प्रमाणे धर्मादाय सेवा सहकारी संस्था  या खासगी बाह्य संस्थेकडून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
एकावेळी सहा महिन्यांपेक्षा जास्त नाही अथवा परिचारिकांची रिक्त पदे नियमित तत्वावर कंत्राटी तत्वावर घेण्यासाठी मागवलेल्या निविदेत समर्थ बेरोजगार सेवा सहकारी संस्था पात्र ठरली. या सहा महिन्यांच्या कामासाठीच एकूण  ५२ लाख २० हजार रुपयांचे  कंत्राट देण्यात आले.
परिचारिकांअभावी रुग्णसेवेचा (Kandivali Shatabdi Hospital) खोळंबा होऊ नये तसेच अस्थिव्यंग चिकित्सा व सर्वसाधारण शल्यचिकित्सा विभागांचे शस्त्रक्रियागृह दोन पाळ्यांमध्ये सुरू करण्याची तातडी लक्षात घेऊन १  जून ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधी करता या संस्थेकडून २९ परिचारिकांनी सेवा घेण्यात आली. विशेष म्हणजे याची निविदा जानेवारी २०२३ मध्ये काढण्यात आली आणि सेवा घेण्यात आली १ जून पासून. पण सहा महिन्यांच्या कालावधी ३० नोव्हेंबरला संपुष्टात आल्यानंतर डिसेंबर महिन्यात याला मंजुरी घेण्यात आली. (Kandivali Shatabdi Hospital) त्यामुळे सेवा कालावधी असताना प्रशासनाचे याला मंजुरी का घेतली नाही असा सवाल उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.