पाण्याचा अपव्यय! मुंबईतील ‘या’ सोसायटीने काढला रामबाण उपाय

घरोघरी पाण्याचे मीटर बसवल्याने पाण्याचा वापर नियंत्रणात आला.

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी, मुंबईतील एका सोसायटीने पाणी बिलिंग प्रणालीचेच विकेंद्रीकरण केले आहे. कांदिवलीच्या चारकोपमधील अमिषा सहकारी गृहनिर्माण सोसायटीने ‘जल बचाओ’ मिशन सुरू केले. याअंतर्गत प्रत्येक घरातील दैनंदिन पाण्याचा वापर मोजण्यासाठी प्रत्येक फ्लॅटमध्ये एक वायरलेस मीटर बसवले. त्यामुळे घराघरात पाणी वापरण्याचे प्रमाण किती आहे, याचा थेट हिशेब समोर आला. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून पाण्याचे वर्षभराचे बील कमी येऊ लागले. अमिषा सीएचएस ही घरगुती पाण्याचा मीटर बसवणारी मुंबईतील पहिली गृहनिर्माण संस्था आहे, असा दावा या सोसायटीचे सचिव मनूभाई पटेल यांनी केला आहे.

गेल्या चार वर्षात या सोसायटीतून लाखो लिटर पाण्याची बचत झाली. जर पाणी मीटर बसवण्याची व्यवस्था मुंबई शहरात सर्वत्र लागू केली तर कोट्यवधी लिटर पाण्याची बचत होईल.
– सुभाषित मुखर्जी, ‘माझी वसुंधरा’ राज्य सरकारच्या मोहिमेचे राजदूत

84 फ्लॅटमध्ये मीटर बसवण्यात आले!

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) पुरवलेल्या पाण्याने इमारतीतील ओव्हरहेड टाक्या भरल्या असल्या तरी त्यातील घरटी किती प्रमाणात पाण्याचा वापर होतो, याची नोंद करण्यासाठी अमिषा सोसायटीने सर्व 84 फ्लॅटमध्ये मीटर बसवले. त्यासाठी रहिवाशांना वार्षिक शुल्क भरावे लागले. याआधी या सोसायटीला येणारे पाण्याचे देयक सर्व घरांमध्ये समप्रमाणात विभागून त्याप्रमाणे वसूल केले जात होते. मात्र मीटर बसवल्यावर कुटुंबांनी पाण्याचा अधिक सावधगिरीने वापर करण्यास सुरुवात केली. सोसायटीमध्ये पाण्याचा वापर 50 टक्क्यांनी कमी झाला. सोबतच प्रत्येक घराचं बीलही 60 टक्क्यांनी कमी झाले. मीटर बसवण्यासाठी सोसायटीला एकूण 13 लाख रुपये खर्च आला. तो प्रत्येक फ्लॅट 12 हजार ते 15 हजार रुपये वसूल करून भरण्यात आला, असे मनुभाई पटेल म्हणाले.

(हेही वाचा : काँग्रेस पक्ष अध्यक्षविना! कोण निर्णय घेतो माहित नाही! कपिल सिब्बल यांचा घराचा आहेर)

चार वर्षात लाखो लिटर पाण्याची बचत

याआधी 40 पेक्षा अधिक घरांत खराब नळ होते. गळणा-या नळांतून पाणी वाया जात होते, पण पाण्याचा मीटर बसवल्यापासून लोकांनी घरातील नळ लगेच दुरूस्त करुन घेतले. आमुलाग्र बदल या उपक्रमाने घडवून आणला, असे पटेल म्हणाले.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here