काँग्रेस (Congress) नेते कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले, “मोदीजी संघी आहेत आणि संघी ही शिवी आहे.” एवढेच नाही तर कन्हैयाने संघाच्या स्वयंसेवकांना ‘दहशतवादी’ म्हटले आहे. कन्हैया कुमार म्हणाले की, “गांधींना गोळ्या घालणे योग्य आहे का?” या विधानाचा उल्लेख करत कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी संघाच्या स्वयंसेवकांना दहशतवादी म्हटले आहे. (RSS)
( हेही वाचा : मध्य रेल्वेवर रविवारी Mega Block; काय आहे वेळापत्रक?)
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. कन्हैया कुमार यांनी याआधीही अशी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. याआधीही त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (Rashtriya Swayamsevak Sangh) तुलना ‘दहशतवादी संघटना’ अशी केली होती. यामुळे वाद निर्माण झाला होता. दरम्यान कन्हैया कुमारच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ पाहिल्यावर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. लोक सोशल मीडियावर कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतना दिसत आहेत. (RSS)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community