- विशेष प्रतिनिधी, मुंबई
कांजूर गावातील नागरिकांना पूर्व द्रुतगती महामार्ग गाठण्यासाठी जिथे १० ते १५ मिनिटांचा कालावधी लागत होता, तो आता कमी होऊन २ मिनिटांवर येणार आहे. कांजूर गाव ते पूर्व द्रुतगती महामार्ग जोडणारा नवीन ३० फुटी रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून येत्या काही महिन्यांतच हा रस्ता पूर्ण होऊन वाहतुकीस खुला होणार आहे. त्यामुळे कांजूर गावातील रहिवाशांना अवघ्या दोन मिनिटांमध्ये पूर्व द्रुतगती महामार्ग गाठून ठाणे आणि ऐरोलीचा प्रवास कमी वेळात करता येणार आहे. (Kanjoor Marg Road)
(हेही वाचा – New Districts In Maharashtra : महाराष्ट्रात २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित; ऐतिहासिक बदलाच्या दिशेने पाऊल)
कांजूर मार्ग पोलिस स्थानकापासून व वात्सल्य ट्रस्ट शेजारुन ३० फुटी रुंदीचा विकास नियोजन रस्ता आता पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडला जात असून याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरु आहे. या मार्गावरील पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे रस्त्यांचे काम सुरु आहे. हे काम ५० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. हे काम येत्या काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. (Kanjoor Marg Road)
(हेही वाचा – New Districts In Maharashtra : महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांमुळे विधानसभा व लोकसभा मतदारसंघ वाढणार; राजकीय बदलाची तयारी)
शिवसेनेच्या स्थानिक माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी सन २०१८ मध्ये हा विकास नियोजन रस्ता मंजूर करून घेतला होता, परंतु पुढे कोविडमुळे या रस्त्यांचे काम हाती घेण्यात विलंब झाला होता. याबाबत बोलतांना सुवर्णा करंजे यांनी हा रस्ता कांजूर मार्ग पोलिस ठाण्यापासून सुरु होऊन पूर्व द्रुतगती महामार्गाला जाऊन जोडतो. ज्यामुळे हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीस खुला होईल तेव्हा अवघ्या २ मिनिटांमध्ये पूर्व द्रुतगती मार्गापर्यंतचा प्रवास करता येणार आहे. सध्या जॉली मार्ग, विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवरून कांजूरमार्गवरील नागरिकांना पूर्व द्रुतगती महामार्ग गाठावे लागत आहे. या वळणाच्या प्रवासासाठी नागरिकांना १० ते १५ मिनिटांचा वेळ लागतो. तो वेळ या नवीन रस्त्यामुळे कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (Kanjoor Marg Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community