भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेतील अगाध ज्ञानाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार व्हावा, या उद्देशाने कानपूर विश्वविद्यालयाच्या परिसरात ‘गीता चेयर’ची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थी, अभ्यासक आणि ज्यांना गीता या विषयावर पीएचडी करण्याची इच्छा आहे त्यांना मदत व्हावी तसेच संशोधकांना या विषयावर अधिकाधिक संशोधन करण्यात यावे, याकरिता ही स्थापना करण्यात आली आहे.
देशभरात ‘गीता’ या विषयाशी संबंधित अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, मात्र कानपूर विश्वविद्यालय परिसरात गीता चेयरच्या स्थापनेमुळे भगवद्गगीतेतील ज्ञान, श्लोक आणि त्यातील सर्व अध्यायांचा समग्र अभ्यास करून संशोधकांना सखोल संशोधन करण्यासाठी मदत होणार आहे.
(हेही वाचा – Onion Prices : निर्यात शुल्कामध्ये वाढ होताच कांद्याचे दर हजार रुपयांनी पडले; शेतकरी संतप्त)
याबाबत छत्रपती शाहू महाराज विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्राध्यापक विनय पाठक यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धेच्या काळात तरुण आणि जिज्ञासूंना गीतेतील ज्ञानाचा विस्तृत अभ्यास करता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर गीतेचा प्रचार-प्रसार होईलच याशिवाय गीतेतील अलौकिक ज्ञानाचा शोध घेता येईल.
18 अध्यायांवर आधारित विविध स्पर्धा
याआधीही कानपूर विद्यापीठाने गीता जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी अनेक कार्यक्रम केले आहेत. कानपूर विद्यापीठ गीता जयंतीसंदर्भात अनेक कार्यक्रम आयोजित करत आहे. याअंतर्गत विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. विश्वविद्यालयातर्फे गीतेतील 18 अध्यायांवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही पहा –