कपिल सिब्बलांचे राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! सत्तासंघर्षावर गुरूवारी पुन्हा सुनावणी

राज्याच्या सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी पूर्ण झाली असून, गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा कपिल सिब्बल आपला युक्तिवाद सुरू करणार आहेत.

( हेही वाचा : “म्हणून राज्यपालांनी ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदेंना सरकार स्थापनेसाठी बोलावलं”, तुषार मेहतांचा युक्तिवाद)

कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे

  • ३ जुलैला सुनील प्रभूंनी भाजपा उमेदवाराला मतदान न करण्याचा व्हीप बजावला होता पण याचे उल्लंघन करण्यात आले. एकनाथ शिंदेंना पदावरून दूर करून अजय चौधरींना नियुक्त केल्याचे पत्र अध्यक्षांना दिले होते त्यांनी ते स्वीकारलेही होते मग राज्यपालांनी कोणत्या अधिकाराखाली एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावले असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केली आहे.
  • घटनेच्या कोणत्या आधारावर ३४ आमदार म्हणतात की आम्ही शिवसेना पक्ष आहे? शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. ४ जुलैपर्यंत कोणीही या निर्णयावर आक्षेप घेतला नव्हता किंवा तो बदलला नव्हता. मग एकनाथ शिंदे गट असा दावा कसा करू शकतील की, आम्ही शिवसेना आहोत? असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.
  • लोकशाही म्हणजे केवळ आकडे नाहीत. राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांनी केवळ आमदारांच्या आकड्यांना नव्हे तर राजकीय पक्षाला महत्त्व दिले पाहिजे. कारण आमदार ज्या तिकिटावर निवडून आले त्या पक्षापेक्षा ते महत्त्वाचे नाहीत.
  • राज्यपालांनी आमदारांना नव्हे तर राजकीय पक्षाला महत्त्व दिले पाहिजे. अन्यथा आयाराम-गयारामचे युग येईल.
  • ३४ जण आयोगाकडे गेले असते तर आपोआप अपात्र ठरले असते पण त्यावेळी तसे झाले नाही. राज्यपालांनी या बंडखोरांना निवडणूक आयोगाकडे पाठवायला हवे होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here