कराड विमानतळ आता एमआयडीसीच्या ताब्यात

153

सातारा जिल्ह्यातील पाचशे एकर क्षेत्रात कृषी उद्योग (ॲग्रो इंडस्ट्री) उभारण्यासह कराड विमानतळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याची घोषणा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

( हेही वाचा : Sunday Megablock : रविवारी प्रवाशांची होणार गैरसोय; पहा मेगाब्लॉकचे संपूर्ण वेळापत्रक!)

अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. एन.डी.आर.एफ.च्या निकषात बदल करुन राज्यातील शेतकऱ्यांना 4 हजार 750 कोटींचे वाटप करण्यात आले. तसेच नियमित कृषी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजाराची मदतही देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात विविध पिकांचे संशोधन होण्यासाठी बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र उभारणीसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे ज्या पशुपालकांची जनावरे दगावले आहेत त्यांनाही शासनामार्फत मदत करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र उभारणार

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कृष्णा आणि कोयना या नद्या शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम करित आहे. कराड पाटण सातारा येथील शेतकऱ्यांसाठी बहुउद्देशीय कृषी संकुल उभारण्याचा मानस आहे. या संकुलाच्या माध्यमातून विविध पिकांचे संशोधन करण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.