लव्ह जिहाद, गोहत्या विरोधात कराडमध्ये हिंदूंचा एल्गार

118

राज्यभर ठिकठिकाणी हिंदूंचे मोर्चे निघत आहेत, लव्ह जिहाद, गोहत्या आणि समान नागरी कायद्याची मागणी यासाठी हिंदू संघटित होत आहेत. सोमवारी, २३ जानेवारी रोजी कराड येथे हिंदू गर्जना मोर्चा काढला. यावेळी तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर हे विशेष केंद्रस्थानी होते.

हिंदू राष्ट्राची मागणी 

कराडचे प्रवेशद्वार असलेल्या पांढरीच्या मारुती मंदिरापासून आमदार राजसिंह ठाकूर, भाजपनेते डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या मुख्य मार्गावरून हिंदू गर्जना मोर्चा निघाला होता. मोर्चाच्या अग्रभागी भगव्या टोप्या घातलेल्या युवती, महिला हातात ध्वज आणि आपल्या मागण्यांचे फलक घेवून सहभागी झाले होते. मोर्चात बहुतेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्याने या आंदोलनाला भव्य स्वरूप आले होते. हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तरुणांनी जोपासण्याची आवश्यकता असताना बाळासाहेबांच्या जन्मदिनी आज हजारो तरुण हिंदुत्वाचा विचार घेऊन या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे हिंदू तरुण केवळ मंदिरात घंटा वाजवणारा नव्हे तर देशद्रोह्यांना ठोकणाराही असला पाहिजे. लव्ह जिहाद, गोहत्या आणि धर्मांतर रोखण्याची आज आवश्यकता असून, तरुणांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेनुसार अखंड हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी कटिबध्द राहिले पाहिजे असे आवाहन राजसिंह ठाकूर यांनी केले.

(हेही वाचा बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण; उद्धव ठाकरे अनुपस्थित, राज ठाकरेंची हजेरी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.