Karnataka Accident: कर्नाटकात भीषण अपघात! भाविकांनी भरलेल्या बसची ट्रकला धडक; १३ जणांचा मृत्यू

91
Karnataka Accident: कर्नाटकात भीषण अपघात! भाविकांनी भरलेल्या बसची ट्रकला धडक; १३ जणांचा मृत्यू
Karnataka Accident: कर्नाटकात भीषण अपघात! भाविकांनी भरलेल्या बसची ट्रकला धडक; १३ जणांचा मृत्यू

कर्नाटकातील हावेरी येथे भीषण रस्ता अपघात (Karnataka Accident) झाला आहे. एका ट्रॅव्हलरने मागून रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बडगी तालुक्यातील गुंडेनहल्ली क्रॉसजवळ हा अपघात झाला.

(हेही वाचा –Delhi Airport Roof Collapses: दिल्ली एअरपोर्टचं छत कोसळलं; गाड्यांचा चक्काचूर)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून नुकसान झालेल्या वाहनातून मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी सांगितले की, पीडित शिवमोगा येथील रहिवासी असून बेळगाव जिल्ह्यातील सावदत्ती येथून येल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी यात्रेनंतर परतत होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. (Karnataka Accident)

(हेही वाचा –Maharashtra Satate Budget 2024 : राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार! सरकार ‘या’ घोषणा करण्याच्या तयारीत)

बसचा ड्रायव्हरला डुलकी आल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Karnataka Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.