कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडल्याबद्दल कन्नड समर्थक आणि शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (२९ सप्टेंबर ) पुकारलेल्या कर्नाटक बंदला((Karnatak Bandh)) संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी ६ वाजता हा बंद सुरू झाला असून कन्नड समर्थकांनी वेगवेगळ्या ठिकाणी निषेध आणि घोषणाबाजी केली आहे. बेंगळुरू, म्हैसूर आणि मंड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. राज्यातील बहुतांश दुकाने बंद ठेवण्यात आली. शाळा बंद, विमानं रद्द, वाहतूक खंडित, कर्नाटकात पाणी प्रश्न पेटला, २०० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Karnatak Bandh)
आंदोलकांनी विमानतळावर घोषणाबाजी केल्याने गोंधळ उडाला होता, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर, दुसरीकडे राज्यातील वाहतूक सेवाही खंडीत झाली असून हॉटेल आणि इतर सुविधाही बंद ठेवण्यात आले आहेत. बंद दरम्यान केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल ४४ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आंदोलकांनी विमानतळावर घोषणाबाजी केल्याने गोंधळ उडाला होता, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले.(Karnatak Bandh)
काय आहे कारण
कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरण आणि त्याची सहाय्यक संस्था कावेरी जल नियमन समिती च्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे कावेरी जल नियमन समितीने १५ ऑक्टोबरपर्यंत तमिळनाडूला प्रतिसेकंद तीन हजार क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश कर्नाटक सरकारला दिले. या निर्देशाविरोधात कन्नडी समर्थक संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, या निर्देशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची भूमिका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केली. (Karnatak Bandh)
(हेही वाचा : Pakistan : लष्कर-ए-तोयबाचा सक्रीय कार्यकर्ता मौलाना झियाउर रहमानची कराचीमध्ये भरदिवसा हत्या; आयएसआयची चिंता का वाढली)
या सेवा सुरळीत
दरम्यान, बेंगळुरू मेट्रो रेल्वे कार्यरत असून राज्य परिवहन विभागानेही राज्य परिवहन महामंडळांना सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, बँका, रुग्णालयेही कार्यरत आहेत.तसंच सरकारी कार्यालये देखील कार्यरत आहेत. तमिळनाडूच्या सीमा असलेल्या कर्नाटकातील जिल्ह्यांना बंदच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
हेही पहा –