कर्नाटकात (Karnataka) हिजाब वाद हा काही नवीन नाही. मात्र आता तर कहरच झाला आहे. नुकताच कर्नाटकामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही शाळकरी विद्यार्थिनींनी बुरखा (Burqa) न घातल्यामुळे एका बस चालकाने त्यांना त्या बसमध्ये चढूच दिले नाही. त्यानंतर त्या बस चालकाने त्या मुलींसोबत वाद घातला. सध्या या घटनेवर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नेमका प्रकार काय?
कर्नाटकमधल्या कलबुर्गीमध्येही गुरुवारी (२७ जुलै) सकाळी काही शाळकरी मुली नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत जाण्यासाठी बस स्थानकावर उभ्या होत्या. बस आल्यावर या मुली बसमध्ये चढत असताना बस चालकाने त्यांना अडवून बुरखा का घातला नाही असा जाब विचाररला. त्यानंतर बस चालकाने खाली उतरून त्या विद्यार्थिनींशी वाद घातला. हा गोंधळ ऐकून तिथे माणसांची गर्दी झाली. त्यावेळी त्या बस चालकाचं म्हणण ऐकून लोकांनी संताप व्यक्त केला. सध्या सोशल मीडियावरून या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस कलबुर्गीमधल्या कमालपूर तालुक्यातील ओकाली गावतून बसवकल्याण या ठिकाणी जात होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मुस्लिम विद्यार्थिनींनी बुरखा परिधान करावा त्यानंतरच त्यांना बसमध्ये प्रवेश दिला जाईल अशी भूमिका त्या चालकाने घेतली होती. चालकाच्या म्हणण्यानुसार मुस्लिम मुलींनी बुरखा परिधान केलाच पाहिजे, नुसता हिजाब घालू नये. याच गोष्टीसाठी त्याने विद्यार्थिनींची अडवणूक केली. मात्र इतर प्रवाशांनी बस चालकाला जाब विचारला तेव्हा त्याने आपली भूमिका बदलली. बसमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने विद्यार्थिंनींना बसमधून खाली उतरवल्याचं त्याने त्यावेळी सांगितलं.
(हेही वाचा – तुळशी, विहार,तानसापाठोपाठ मोडकसागर तलावही भरले)
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या घटनेवरून कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. ट्विट करत अतुल भातखळकर यांनी म्हंटले आहे की, ” काँग्रेस का हाथ, धर्मांधों के साथ… कर्नाटकातील कलबुर्गी येथे काही शाळकरी विद्यार्थिनींनी बुरखा न घातल्याने एका बस चालकाने त्या मुलींना बसमध्ये चढू दिलं नाही. बस चालकाने त्या मुलींशी वाद घातला. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यावर धर्मांधांची हिंमत किती वाढली आहे त्याचा हा पुरावा.”
काँग्रेस का हाथ
धर्मांधों के साथ…
कर्नाटकातील कलबुर्गी येथे काही शाळकरी विद्यार्थिनींनी बुरखा न घातल्याने एका बस चालकाने त्या मुलींना बसमध्ये चढू दिलं नाही. बस चालकाने त्या मुलींशी वाद घातला. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यावर धर्मांधांची हिंमत किती वाढली आहे त्याचा हा पुरावा pic.twitter.com/VqSpVtQo7M— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 28, 2023
दरम्यान, या संपूर्ण घटनेवर कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून बस चालकाचं वागणं अयोग्य असल्याचं सांगत कारवाईचं आश्वासन दिलं आहे. याप्रकरणात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, पण व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरुन बस चालकाचं हे कृत्य योग्य नसल्याचं परिवहन मंत्यांनी म्हटलं आहे. याची सतत्या तपासण्याचे आदेशही त्यांच्याकडून देण्यात आले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community