श्रीरंगपटना जामिया मशिदीच्या एएसआय सर्वेक्षणासाठी कर्नाटक High Court ची सरकारला नोटीस 

याचिकाकर्त्याने विनंती केली की, ASI ला या जागेचे सर्वेक्षण आणि उत्खनन करण्याचे निर्देश देण्यात यावे आणि 30 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात (High Court) तथ्यात्मक अहवाल सादर करावा.

161

श्रीरंगपटना येथील मुदला बगिलू अंजनेय स्वामी मंदिराच्या जागेवर टिपू सुलतानने जामिया मशीद बांधल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ला उत्खनन करून अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात (High Court) दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

बजरंग सेनेच्या राज्य युनिटचे प्रमुख एच. मंजुनाथ यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया आणि न्यायमूर्ती केव्ही अरविंद यांच्या खंडपीठाने एएसआय, सरकारचे मुख्य सचिव, मंड्याचे उपायुक्त, राज्य धार्मिक परिषद आणि कर्नाटक राज्य वक्फ बोर्ड यांना नोटीस बजावली.

मशिदीवर हिंदू मंदिराचे अवशेष 

याचिकाकर्त्याच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, मुदाला बगिलू अंजनेय स्वामी मंदिराला ऐतिहासिकदृष्ट्या विजयनगर साम्राज्य आणि म्हैसूर साम्राज्यासह विविध राज्यकर्त्यांनी संरक्षण दिले होते. तथापि, त्याच जागेवर जामिया मशीद बांधणाऱ्या टिपू सुलतानने हे मंदिर कथितरित्या नष्ट केले होते. याचिकाकर्त्याने विनंती केली की, ASI ला या जागेचे सर्वेक्षण आणि उत्खनन करण्याचे निर्देश देण्यात यावे आणि 30 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात (High Court) तथ्यात्मक अहवाल सादर करावा. याचिकाकर्त्याने एएसआय, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाला मंदिर परिसरात सापडलेल्या हिंदू संस्कृतीचे अवशेष आणि वारसा जतन करण्याचे आवाहन केले आहे, जसे की गरुड कंबा, कल्याणी, स्तूप, स्तंब, हिंदू देवतांचे दगडी कोरीव काम, काही भाग, भूमिगत मंदिर, वास्तुशिल्प आणि पुरलेल्या मूर्ती यांचा समावेश असेल. याचिकाकर्त्याच्या युक्तिवादांना उत्तर देताना, न्यायालयाने प्रश्न केला की, संबंधित जागा संरक्षित स्मारक आहे का, तसेच 11 जूनपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

(हेही वाचा ख्रिस्ती धर्माचा प्रसार करून धर्मांतर करणाऱ्या पाद्रीने स्वीकारला Hindu Dharm)

मंजुनाथ म्हणाले, “आम्ही ऑक्टोबर 2022 मध्ये उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली, मशिदीच्या भिंतीवर प्रथम दर्शनी हिंदू देवता आणि प्राण्यांचे कोरीव काम पाहिले जाऊ शकते आणि आत एक कारंजे आणि शिवलिंग आहे, यावरून सिद्ध होते की, ती हिंदू रचना आहे. हिंदूंना त्याचे जतन करण्याचा अधिकार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.