कर्नाटकातील (Karnataka) रायचूरमध्ये मुबिन (Mubin) नावाच्या एका कट्टरपंथी तरुणाने तरुणीला निकाह करण्यासाठी मागणी घातली. परंतु तरुणीने नकार दिल्याने कट्टरपंथी मुबिनने तरुणीची हत्या केली. ही घटना दि. ३० जानेवारी २०२५ रोजी घडल्याची माहिती आहे.
( हेही वाचा : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे Shubanshu Shukla ठरले पहिले भारतीय ; NASA ची माहिती)
पीडित तरुणी सिंधानूर (Sindhanur) शहरातील एका खाजगी महाविद्यालयात एमएससीचे (MSc) शिक्षण घेत होती. त्याचवेळी कट्टरपंथी तरुणाने तरुणीवर निकाह करण्यासाठी दबाव टाकला. पण तरुणीने नकार आरोपी तरुणीने तिचा गळा चिरत हत्या केली. पीडित तरुणीचे वय २४ वर्ष असल्याची माहिती आहे. याप्रकरणाच्या अहवालानुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकाला गेल्या सहा वर्षांपासून ओळखत होते. मात्र पीडितेचे पालक आपल्या मुलीचा निकाह इतर तरुणीशी करण्याचा विचार करत होते. (Mubin)
पण आरोपी कट्टरपंथीला ही माहिती मिळताच पीडितेवर निकाह करण्यास दबाव टाकला. त्यानंतर पीडितेने नकार देताच त्यांने लिंगासगुरुहून (Lingsugur) सिंधानूरला जाणाऱ्या मुलीवर हल्ला केला. आरोपीने सिंधानूरल सरकारी पदवी महाविद्यालयाजवळ मुलीच्या मानेवर वार केला. तिचा गळा चिरून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.(Mubin)
दरम्यान आरोपीने पीडितेचा निकाह पालक ज्या मुलाशी लावण्याचा निर्णय घेतला होता, त्याच्या दुकानात जाऊन गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी संबंधित घटनेची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी महाविद्यालयात सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात आता आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. (Mubin)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community