Karnataka Sex Scandal : कर्नाटकचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Karnataka Sex Scandal : निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना यांची शुक्रवारी सकाळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. काल मध्यरात्री सुमारे 35 दिवसांनी मायदेशी परतलेल्या प्रज्वल यांना बेंगळुरू विमानतळावर उतरताच एसआयटीने ताब्यात घेतले.

139
Karnataka Sex Scandal : कर्नाटकचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी
Karnataka Sex Scandal : कर्नाटकचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांना 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी

कर्नाटकातील (Karnataka) हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांना लैंगिक शोषण प्रकरणात 6 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बेंगळुरूच्या न्यायालयाने रेवन्ना यांना दररोज त्यांच्या वकिलाला भेटण्याची परवानगी दिली आहे.

रेवन्ना प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करत आहे. एसआयटीने रेवण्णाविरुद्धच्या 3 लैंगिक शोषण प्रकरणात 15 दिवसांची कोठडी मागितली होती. लैंगिक छळाच्या प्रकरणात हवा असलेला जेडीएसचे निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना यांची शुक्रवारी सकाळी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. काल मध्यरात्री सुमारे 35 दिवसांनी मायदेशी परतलेल्या प्रज्वल यांना बेंगळुरू विमानतळावर उतरताच एसआयटीने ताब्यात घेतले. (Karnataka Sex Scandal)

(हेही वाचा – Local Railway Jumbo Block: मुंबई विद्यापिठाचा विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय)

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळाचा आरोप

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (H D DeveGowda) यांचा नातू प्रज्वल रेवन्ना गेल्या महिनाभरापासून चर्चेत आहे. हसनमधून लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढवणारे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तसेच आणखी काही महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. काही अश्लील व्हिडिओही उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे.

प्रज्वल रेवन्ना हे 26 एप्रिलला त्यांच्या मतदारसंघात मतदान करून जर्मनीला गेले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केले होते. इंटरपोलने त्याच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीसही जारी केली होती. येथे त्यांचा खासदार म्हणून डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. (Karnataka Sex Scandal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.