अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची प्रतीक आहे. हे मंदिर नव्हे तर आमच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्याचा कायम अभिमान आम्हाला असेल. अयोध्येत श्रीराम प्रभूंची प्राणप्रतिष्ठा म्हणजे रामराज्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. इच्छाशक्तीतून हे स्वप्न साकार झाले असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले. खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात काढण्यात आलेल्या श्रीराम रथयात्रा समारोप आणि कारसेवकांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजन भंडाऱ्यातील रेल्वे मैदानावर २१ रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. व्यासपीठावर भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि अक्षदा वितरण समितीचे जिल्ह्याचे प्रमुख मयूर बिसेन उपस्थित होते. (DCM Devendra Fadnavis)
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेला माल्यारपण केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात जेष्ठ कारसेवक राम चाचेरे, माधव गुंडावार, रामदास शहारे, महिला कारसेवक देवगडे काकू, सीमा व्यवहारे आणि प्रत्यक्ष अस्थाई मंदिर बांधण्याच्या कामात हातभार लावणारे मजूर तूलाराम चुंभरे यांचा सत्कार करण्यात आला. तर अन्य कारसेवकांचा खासदार सुनील मेंढे यांनी स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. जवळपास १६० कार सेवकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक करताना खासदार सुनील मेंढे यांनी कारसेवेतील त्यांचे अनुभव सांगितले. राम नामाचा संदेश घेऊन काढण्यात आलेल्या रथ यात्रेतील अनुभव यावेळी त्यांनी सांगून राम मंदिर हे सर्वांच्या दृढ भक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचे सोहळ्याला आल्याबद्दल आभारही मानले. (DCM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Muslim : पनवेल रेल्वेस्थानक परिसरात भगवे ध्वज लावण्यास धर्मांधांचा विरोध )
राम मंदिराच्या निमित्ताने गुलामगिरीचे प्रतीक नष्ट
पुढे मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी रथयात्रेसाठी खासदारांचे अभिनंदन केले. रामराज्य आणण्याच्या दृष्टीने ही रथयात्रा महत्त्वाची असल्याचे सांगून श्री रामाचे मंदिर हे भारताच्या अस्मितेचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत देशाच्या मनातून राम कृष्ण काढला जात नाही, तोपर्यंत हिंदूंना गुलाम करू शकत नाही या विचारानेच हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे झाली. अयोध्येच्या राम मंदिराच्या निमित्ताने गुलामगिरीचे हे प्रतीक नष्ट झाल्याचेही ते म्हणाले. प्रत्येकाने अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राम भजन संधेचे आयोजन करण्यात आले होते. जॉली दास आणि भूषण जाधव यांनी अप्रतिम राम गीतांचे सादरीकरण करून श्रोत्यांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाचे संचालन चैत्नय उमाळकर यांनी केले. (DCM Devendra Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community