आज भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन कर्तव्यपथावर साजरा करण्यात आला. या दिवसाला खास बनवण्यासाठी कर्तव्यपथावर भव्यदिव्य परेडने देशवासियांना अभिमानाने आणि उत्साहाने भरून टाकले. यंदा प्रजासत्ताक दिनासोबतच भारतीय राज्यघटना लागू झाल्याचा ७५ वा वर्धापन दिनही साजरा केला जात आहे. इंडिनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो (Prabowo Subianto) हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू (Droupadi Murmu) राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्याची सुरुवात केली. यावेळी झालेल्या परेडमध्ये पहिल्यांदाच पाच हजार कलाकारांनी एकाच वेळी आपली कला सादर केली. (Kartavya Path)
( हेही वाचा : Republic Day : मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकावला)
परेडची सुरुवात संस्कृती मंत्रालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. ३०० कलाकारांनी वाद्य वाजवत परेडची सुरुवात केली. त्यानंतर इंडोनेशियन लष्करी जवानांची तुकडी कर्तव्य पथावर संचलन केले. याच एकाच वेळी पाच हजार कलाकारांनी आपल्या अभिनयाने आणि नृत्याने देशाच्या सांस्कृतिक वारशाची झलक दाखवली. या सांस्कृतिक कार्यक्रमाला ‘जयति जय-जय मम भारतम’ असे नाव देण्यात आले होते. ज्यामध्ये देशाच्या विविध भागांतील कलाकारांनी ४ हून अधिक नृत्यप्रकार सादर केले. ११ मिनटाचा हा कार्यक्रम देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा सन्मान करणाऱ्या विविधतेची एक अद्भुत झलक होता. (Kartavya Path)
दरम्यान भारतीय लष्कराच्या जवानांनी भीष्म टँक (Bhishma Tank), पिनाका मल्टी लाँचर रॉकेट सिस्टिमसह (Pinaka Multi Launcher Rocket System) संचलन केले. हवाई दलाच्या फ्लायपास्टमध्ये ४० विमानांनी भाग घेतला. ज्यामध्ये २२ लढाऊ विमाने, ११ वाहतूक विमाने आणि ७ हेलिकॉप्टर सामील होते. अपाचे, राफेल आणि हरक्यूलिस या फ्लाय पास्टचा भाग होते. परेडमध्ये १५ राज्ये आणि १६ मंत्रालयाची झलक पाहायला मिळाली. (Kartavya Path)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community