Karwa Chauth 2023 : दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये करवा चौथची धूम

मेहंदी..,. बांगड्या... दागिने... कपडे खरेदीसाठी महिलांची लगबग

120
Karwa Chauth 2023 : दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये करवा चौथची धूम
Karwa Chauth 2023 : दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये करवा चौथची धूम
  • वंदना बर्वे

सुंदर सुंदर बांगड्या….. हातावरील मेहंदी…. अगदी सुंदर वधूप्रमाणे नेसलेला लेहंगा वा साडी….वेशभूषेला साजेसा असाच केस शृंगार… हातात चांदीचा करवा आणि चाळण घेतलेल्या महिलांमुळे दिल्लीतील प्रत्येक सोसायटीमध्ये करवा चौथची लगबग दिसून येते. खरं तर हिंदी चित्रपटांमुळे करवा चौथ देशातील घरोघरी माहिती आहे. मात्र देशाच्या राजधानीत खऱ्या अर्थाने करवा चौथ कसा साजरा करतात, हे लक्षात येते. बाजारात महिलांना खरेदी करण्याचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. अगदी नववधूप्रमाणे सजून पंजाबी महिला अतिशय उत्साहात करवा चौथ साजरा करतात, हे विशेष. (Karwa Chauth 2023)

भारताच्या उत्तर भागात सौभाग्यवतींचा सण म्हणून ओळखला जाणार ‘करवा चौथ’ बुधवार, १ नोव्हेंबर रोजी देशभरात सर्वत्र साजरा केला जाणार आहे. पतीचे आयुष्य वाढविणाऱ्या या सणात खरेदीसाठी बाजारांमध्ये महिलांनी एकच गर्दी केली आहे. दिल्लीतील करोलबाग, टिळकनगर, लाजपत नगर, सरोजनीनगर मार्केट आदी बाजारपेठांमध्ये पाय ठेवायला जागा नाही एवढी महिलांची गर्दी झाली आहे. बांगड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत, ब्युटीपार्लरपासून ते साड्यांच्या दुकानापर्यंत सौभाग्यवती महिलांची एकच गर्दी बघायला मिळत आहे. (Karwa Chauth 2023)

करवा चौथचा सण उद्या १ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. विवाहित महिलांची डिझायनर साड्यांना पहिली पसंती आहे. बांगड्या, डिझायनर ब्रेसलेट, नेलपॉलिश, लिपस्टिक आदींची विक्री वाढली आहे. यातही आर्टिफिशियल ज्वेलरी, मेकअप आयटम्स व्यतिरिक्त स्टोन स्ट्रेनर्सना सर्वाधिक मागणी आहे. करवा चौथमुळे ब्युटी पार्लरमध्येही गर्दी होत आहे. करवा चौथसाठी पुजेच्या थाळीची किंमत २२५ रुपये ते १००० रुपये आहे. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या पूजा साहित्याचा समावेश आहे. (Karwa Chauth 2023)

अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी महिला करवा चौथचा सण साजरा करतात. मुळात करवा चौथ हा सण नसून एकप्रकारचे व्रत आहे. महाराष्ट्रात हाच सण ‘वटसावित्री’ म्हणून साजरा केला जातो. महिलांकडून या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. यामुळे दुकानदार आणि व्यापार्‍यांनीही चांगला व्यवसाय होईल या आशेने दर्जेदार साहित्य मागवले आहे. (Karwa Chauth 2023)

करवा चौथला महिला १६ प्रकारचा शृंगार करतात. दिवसभर कठोर व्रत करतात. दिवसभर पाणी सुध्दा पित नाहीत. फळ घेणे तर लांब राहिले. यावेळी बनारसी आणि कांजीवरम साड्यांसोबत हलक्या वजनाच्या लेहेंग्यांनाही खूप मागणी आहे. जयपूर, बंगळुरू, बनारस आणि कोलकाता येथून स्टोन वर्क असलेल्या भरतकाम केलेल्या साड्या बाजारात आहेत. (Karwa Chauth 2023)

कांजीवरमची मागणी

दिल्लीच्या बाजारपेठेत सर्वात जास्त मागणी कशाला असेल तर ती कांजीवरम साड्यांना. संपूर्ण बाजारपेठ रेशमी साड्यांच्या ताब्यात आहे असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही. लोकांची मागणी सुध्दा फॅशननुसार बदलत राहते. यावेळी बनारसीसह कांजीवरम साड्यांची मागणी वाढली आहे. हलक्या वजनाच्या आणि भारी दिसणाऱ्या डिझायनर साड्यांनाही पसंती दिली जात आहे. कपड्यांच्या विक्रीत झपाट्याने वाढ झाली आहे. सणांसोबतच लग्न इत्यादी शुभ कार्यासाठी सुध्दा खरेदी करत आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर हा लग्नाचा हंगाम असतो. (Karwa Chauth 2023)

(हेही वाचा – Israel-Hamas conflict: पॅलेस्टिनी समर्थकाने नोंदवला विचित्र पद्धतीने निषेध, सोशल मिडियावर धक्कादायक व्हिडियो व्हायरल)

करवा चौथला मीना बाजार उजळून निघाला

करवा चौथच्या दोन दिवस आधी साडीला मॅच करण्यासाठी आर्टिफिशियल ज्वेलरी आणि बांगड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. सासू तिच्या सुनेला बांगड्या आणि मेकअपचे सामान देते आणि सून तिच्या सासूला. अशा स्थितीत सकाळपासून सायंकाळपर्यंत बाजारपेठ गजबजलेली असते. सोमवारी रात्री उशिरा घंटाघर, सदर, लालकुर्ती, शारदा रोडसह सर्वच बाजारपेठांमध्ये बांगड्या, बांगड्या खरेदी करण्यात आल्या. (Karwa Chauth 2023)

सौंदर्यप्रसाधनांची दुकानेही सजली

टिकली, मेहंदी, सिंदूर, क्रीम, परफ्यूम, बॉडी स्प्रे, नेल पेंट, काजल आदी मेकअपच्या वस्तूंची विक्री सुध्दा मोठ्या प्रमाणावर होत आहे. प्रत्येक विवाहित महिला तिच्या गरजेनुसार वस्तू खरेदी करत आहे. मंगळवारीही रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत खरेदी होणार आहे. (Karwa Chauth 2023)

करवा चौथला पायाच्या अंगठ्यांची अंगठी बदलण्याची परंपरा आहे. बहुतेक घरांमध्ये या परंपरेचे पालन केले जाते. सासू सुनेला अंगठी देते. पैजणांची सुध्दा मागणी खूप आहे. हलक्या आणि जड वजनाच्या अशा दोन्ही पैजणांची खरेदी केली जात आहे. एवढेच नव्हे तर, महिलांच्या सोयीसाठी यावेळेस पुजेची थाळी सुध्दा बाजारात आली आहे. महिला नेहमी पुजेसाठी स्टीलची थाळी वापरतात. त्यात पुजेच्या वस्तु ठेवाव्या लागतात. परंतु आता संपूर्ण पॅकसह थाळी बाजारात उपलब्ध आहे. या थाळ्या गोटा आणि कापडाने सजवल्या जातात. त्यात पुजेचे सर्व साहित्य पॅक केलेले असते. (Karwa Chauth 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.