Kash Patel यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून अमेरिकेच्या एफबीआयच्या संचालकपदाची घेतली शपथ

54

भारतीय वंशाचे आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे निष्ठावंत सहकारी काश पटेल (Kash Patel) यांनी शनिवार, 22 फेब्रुवारी या दिवशी अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (Federal Bureau of Investigation, एफबीआय) च्या संचालकपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी गीतेवर हात ठेवून पदाची जबाबदारी स्वीकारली.

(हेही वाचा – SSC Exam : बोर्डाच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवण्यास नकार दिला म्हणून विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या)

वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊस (White House) कॉम्प्लेक्समधील आयझेनहॉवर एक्झिक्युटिव्ह ऑफिस बिल्डिंगमध्ये काश पटेल यांचा शपथविधी सोहळा पार पडला. अमेरिकेचे अ‍ॅटर्नी जनरल पाम बोंडी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. शपथ सोहळा झाल्यानंतर बोलताना काश पटेल म्हणाले की, “मी अमेरिकन स्वप्न जगत आहे. ज्यांना वाटते की, हे स्वप्न आता अस्तित्वात नाही, त्यांनी माझ्याकडे पाहा. तुम्ही पहिल्या पिढीतील भारतीयाशी बोलत आहात, जो पृथ्वीवरील सर्वात महान राष्ट्राच्या कायदा अंमलबजावणी संस्थेचे नेतृत्व करणार आहे. अशा संधी इतर कुठेही मिळू शकत नाहीत. मी वचन देतो की, एफबीआयमध्ये आणि त्याच्या बाहेरही जबाबदारी आणि पारदर्शकता कायम राहील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश पटेल यांच्या नियुक्तीचे कौतुक केली आणि म्हणाले की, मला काश पटेल आवडतात आणि एजन्सीचे एजंट त्यांचा आदर करतात म्हणून मी त्यांना या पदावर नियुक्त करू इच्छितो. त्यांनी सांगितले की ते या पदावर राहण्यासाठी आतापर्यंतचे सर्वोत्तम व्यक्ती असल्याचे सिद्ध करतील. त्याची नियुक्ती अत्यंत सोपी होती. तो बलवान आणि दृढनिश्चयी आहे. ट्रे गौडी यांनीही त्यांचे कौतुक केले आणि म्हटले की लोकांना पटेल यांच्या क्षमता समजत नाहीत.

काश पटेल यांच्या नियुक्तीला अमेरिकन सिनेटने (US Senate) ५१-४९ मतांनी मान्यता दिली. तथापि, दोन रिपब्लिकन सिनेटर – सुसान कॉलिन्स (मेन) आणि लिसा मुर्कोव्स्की (अलास्का) – यांनी त्यांच्या विरोधात मतदान केले आणि डेमोक्रॅट्सची बाजू घेतली. राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी एफबीआय संचालकांचा कार्यकाळ साधारणपणे १० वर्षांचा असतो. पण काश पटेल यांची ट्रम्पशी असलेली जवळीक लक्षात घेता यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.